दिलासादायक ! कोरोना कमी होतोय, जिल्ह्यात दिवसभरात आढळले 1408 रुग्ण - Comfortable! Corona is declining, with 1408 patients found throughout the day in the district | Politics Marathi News - Sarkarnama

दिलासादायक ! कोरोना कमी होतोय, जिल्ह्यात दिवसभरात आढळले 1408 रुग्ण

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 मे 2021

जिल्हा रुग्णालयातील तपासणीत 248, खासगी तपासणीत 610 व रॅपिड तपासणीत 610, असे एकूण 1408 रुग्ण आज आढळले. पारनेर तालुक्‍यात सर्वाधिक 173, तर त्याखालोखाल शेवगाव तालुक्‍यात 172 रुग्ण आढळले.

नगर : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची (Corona) संख्या सातत्याने घटत चालल्याचे दिसत आहे. तरीही प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत. आज (शुक्रवारी) जिल्ह्यात नवे 1408 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. (Comfortable! Corona is declining, with 1408 patients found throughout the day in the district)

जिल्हा रुग्णालयातील तपासणीत 248, खासगी तपासणीत 610 व रॅपिड तपासणीत 610, असे एकूण 1408 रुग्ण आज आढळले. पारनेर तालुक्‍यात सर्वाधिक 173, तर त्याखालोखाल शेवगाव तालुक्‍यात 172 रुग्ण आढळले. संगमनेर तालुक्‍यात तिसऱ्या क्रमांकाची रुग्णसंख्या आढळली. तेथे आज 131 रुग्ण निष्पन्न झाले. 

जिल्ह्यातील 2296 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 94.21 टक्के झाली आहे. सध्या 11 हजार 863 जणांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात आजअखेर दोन लाख 58 हजार 195 जण बाधित आढळून आले. त्यांपैकी दोन लाख 43 हजार 246 जण बरे होऊन घरी परतले आहेत. आजअखेर एकूण तीन हजार 86 जणांचा मृत्यू झाला आहे. 

"28 हजार ग्रामपंचायतींद्वारे कोरोनामुक्ती अभियान राबवावे' 

राज्यातील ग्रामीण भागातील जनतेने कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर शारीरिक व आर्थिक हानी अनुभवली. याचा प्रादुर्भाव आजही वाढताच आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्‍यता आरोग्यतज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.

एकोप्याने गाव कोरोनामुक्त होऊ शकते, हे हिवरेबाजारने राज्याला दाखवून दिले. राज्यात 28 हजार ग्रामपंचायतींमधून हिवरेबाजारच्या धर्तीवर "कोरोनामुक्त गाव' अभियान राबविण्यात यावे, अशी मागणी आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना याबाबत त्यांनी निवेदन दिले आहे.

राज्यात "कोरोनामुक्त गाव' स्पर्धा घ्यावी, राज्यातील 28 हजार ग्रामपंचायतीद्वारे शासनातर्फे "कोरोनामुक्त गाव स्पर्धा' राबविल्यास प्रत्येक ग्रामस्थ आपले गाव कोरोनामुक्त होण्यासाठी एकजुटीने कार्य करील. 

 

हेही वाचा..

नगरचा आज स्थापना दिन

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख