कोविड रुग्ण आढळण्यात पारनेर नंबर वन !

मागील आठवड्यात तहसीलदार ज्योती देवरे यांनी तालुक्यातील ७१ गावे संवेदनशील जाहीर केली होती. त्या गावात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अस्थापना बंद ठेवण्याचे आदेशही दिले होते.
Antijan test.jpg
Antijan test.jpg

पारनेर : तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र हा आकडा काही केल्या कमी होत नाही. तालुक्यात मागे झालेले लग्न सोहळे व इतर कार्यक्रमांचा हा परिणाम आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडणारा तालुका पारनेर ठरत आहे. मागील आठवड्यात तालुक्यातील अनेक गावे संवेदनशील करूनही काही फायदा झाला नाही. रविवारी तालुक्यात २१० कोरोना रुग्ण आढळून आले.

मागील आठवड्यात तहसीलदार ज्योती देवरे यांनी तालुक्यातील ७१ गावे संवेदनशील जाहीर केली होती. त्या गावात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अस्थापना बंद ठेवण्याचे आदेशही दिले होते. मात्र त्याचा कोरोना प्रसारावर काहीच परिणाम झाला नाही. आजही जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण पारनेरमध्ये आढळले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सुमारे एक महिना राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन केले होते. त्या काळात अनेकांनी आपले धार्मिक कार्यक्रम लग्नविधी पुढे ढकलले होते. आता जनतेला थोडीशी मोकळीक मिळताच अनेकांनी लग्नविधी तसेच धार्मिक कार्यक्रम करण्याचा सपाटा लावला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसात अनेक लग्न तसेच विविध कार्यक्रमांची संख्या मोठ्या पार पडले. त्याचा फटका तालुक्यातील कोरोना फोपावण्यास कारणीभूत झाला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
तालुक्यात रविवारी २१० कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 20 रुग्ण बाभुळवाडे येथे आढळून आले आहेत.

गावनिहाय रुग्ण संख्या

वासुंदे ः १४ , वनकुटे ः १३, निघोज ः १२, कळस ः आठ, काकणेवाडी ः आठ, जातेगाव ः सहा, लोणीमावळा ः पाच, देविभोयरे ः पाच, पळवे खुर्द ः पाच, किन्ही ः पाच, सारोळा आडवाई ः पाच, जवळे ः चार, वाघुंडे खुर्द ः चार, कळमकरवाडी चार, सांगवी सूर्या ः तीन, नारायणगव्हाण ः तीन, कान्हूर पठार तीन. असे असून इतर गावात एक किंवा दोन रूग्ण आढळून आले आहेत.

सलीकरण वेगात

पारनेरमधील ७२ हजार नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. उर्वरितांचे जशा लस उपलब्ध होतील, तसे लसीकरण सुरु आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येक नागिरकाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. प्रशासनाकडून दंड व कारवाई केल्यानंतर नियम पालन करावे.
- डॉ. प्रकाश लाळगे, तालुका वैद्यकीय अधिकारी, पारनेर

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com