तुमची-आमची तिसरी पिढी एकत्रित काम करते ! रोहित पवारांना ढाकणे रमले आठवणीत

रोहित पवार यांनी ढाकणे यांच्या पायाला वाकूनत्यांचे आशिर्वाद घेतले. या वेळी ओबीसी व मराठा आरक्षणावर चर्चा केली.
तुमची-आमची तिसरी पिढी एकत्रित काम करते ! रोहित पवारांना ढाकणे रमले आठवणीत
Dhankne and pawar.jpg

पाथर्डी : तुम्ही जनेतेच्या कामात राहा जनता तुमच्यासोबत येतेच. शरद पवार व मी दोघांनी एकत्रीत काम केले आहे. अॅड. प्रताप ढाकणे व अजित पवार(Ajit pawar) यांनीही संघर्ष केला आहे. आता ऋषीकेश ढाकणे, सिद्धेश ढाकणे व आमदार रोहित पवार यांनीही जनहितासाठी संघर्ष करावा, असा वडीलकीचा सल्ला माजी केंद्रीयमंत्री बबन ढाकणे यांनी आमदार रोहित पवार व ऋषीकेश ढाकणे यांना दिला. (You-our third generation works together! I remember playing Rohit Pawar)

रोहित पवार नुकतेच अॅड. प्रताप ढाकणे यांच्या वाढदिवासाच्या कार्यक्रमाला पाथर्डीत आले होते. कार्यक्रमानंतर पवार यांनी ढाकणे यांची हिंद वस्तीगृहामधे जाऊन भेट घेतली. त्यावेळी ऋषीकेष ढाकणे व सिद्धेश ढाकणे हेही सोबत होते.

रोहित पवार यांनी ढाकणे यांच्या पायाला वाकून त्यांचे आशिर्वाद घेतले. या वेळी ओबीसी व मराठा आरक्षणावर चर्चा केली. केदारेश्वर सहकारी साखर कारखाना निर्मितीमध्ये शरद पवारांनी मदत केली. कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाची मोळी आप्पासाहेब पवार (रोहीत पवारांचे आजोबा) यांच्या हस्ते टाकण्यात आली होती. या व अशा अनेक आठवणींना उजाळा मिळाला.
या वेळी ढाकणे यांनी वडीलकीचा सल्ला देताना रोहित पवारांना सांगितले, की तू शरद पवारांचा नातू, तसा माझाही नातुच आहेस. अजित पवार व प्रताप ढाकणे यांनीही जनसेवा केली आहे व करीत आहेत. आता तुमची आमची ही तिसरी पिढी एकत्रित काम करते आहे. रोहित पवार व ऋषीकेश ढाकणे व सिद्धेश ढाकणे यांनीही जनहितासाठी संघर्ष सुरुच ठेवावा असा सल्ला दिला.

हेही वाचा..

सामाजिक हेतुने केलेले कार्य पवित्र

पाथर्डी : केंद्र व राज्य सरकारच्या सामान्य माणसासाठी असणाऱ्या योजनांच्या माध्यमातून रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे काम स्वस्तिक महीला मंडळाच्या वतीने सुरु आहे. सामाजिक हेतुने केलेले कोणतेही कार्य पवित्रच असते. युवक व युवतीच्या हाताला रोजगार देण्यासाठी स्वस्तिक महीला मंडळासोबत आम्हीही काम करु. तुम्ही योजना राबवा आम्ही सोबत आहोत, असे प्रतिपादन जिल्हा परीषदेच्या सदस्य प्रभावती ढाकणे यांनी केले.

येथील स्वस्तिक महीला मंडळातच्या वतीने पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्या प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्युटीपार्लर, मोबाईल दुरुस्ती, शिलाईकाम इत्यादी कला जोपासणाऱ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, तनिष्का गटप्रमुख मनिषा ढाकणे, स्वाती चव्हाण, रत्नमाला उदमले, उषा जायभाये, सविता भापकर, सपना काटे, आरती निऱ्हाळी, बडुं बोरुडे, सिताराम बोरुडे, हुमायुन आतार, संदीप राजळे उपस्थित होते.

ढाकणे म्हणाल्या, महीलांच्या सोजगारांचा प्रश्न गंभीर आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना गरीबांच्या झोपडीपंर्यत पोहचविण्यासाठी दुवा म्हणुन स्वंयसेवी संस्था काम करीत असतात. सामाजिक कार्यातुन मिळणारे समाधान हे राजकारणातुन मिळालेल्या समाधानापेक्षा अधिक मोलाचे वाटते. सपना काटे व संदीप काटे यांनी युवक व युवतींसाठी राबविला हा उपक्रम रोजगारांच्या नव्या संधी उपलब्ध करुन देणार आहे. प्रस्ताविक सपना काटे यांनी केले. संदीप काटे यांनी केले.

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in