विरोधकांचा निधी वळविला जातोय ! आमदार मोनिका राजळे यांची सरकारवर टीका

महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षांच्या काळात अनेक विकासकामांचा निधी मिळाला नाही. सत्तेतील लोकप्रतिनिधींनाच निधी दिला जातो आहे. विरोधकांचा निधी वळवला जातो.
Monika rajale.jpg
Monika rajale.jpg

पाथर्डी : राज्यात भाजप सरकारच्या मागील पाच वर्षांच्या काळात मतदारसंघात विकासाची कामे झाली आहेत. त्यामुळे विकासाबाबत मुद्दा घेऊन टीका करण्याची संधी विरोधकांना नाही. महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षांच्या काळात अनेक विकासकामांचा निधी मिळाला नाही. सत्तेतील लोकप्रतिनिधींनाच निधी दिला जातो आहे. विरोधकांचा निधी वळवला जातो, अशी टीका आमदार मोनिका राजळे यांनी केली. (Opposition funds are being diverted! MLA Monica Rajale criticizes the government)

चिंचपूर इजदे येथील डोळे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे काम व पेंढारे वस्तीकडील रस्ता काँक्रिटीकरण, स्मशानभूमी, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय, पेव्हिंग ब्लॉक बसवणे, रस्ता काँक्रिकीटकरण, हायमास्ट बसवणे, पाइपलाइन व पाण्याची टाकीच्या कामाचा प्रारंभ राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड, अर्जुन शिरसाट, सोमनाथ खेडकर, माणिक खेडकर, धनंजय बडे, अशोक चोरमले, शुभम गाडे, सरपंच पूजा मिसाळ, वंदना नागरगोजे, नवनाथ खेडकर, अरुण मिसाळ उपस्थित होते.

राजळे म्हणाल्या, ‘‘कोरोनाचे संकट समोर आहे. कोरोनामुळे विकासाच्या कामावरही त्याचा परिणाम झाला आहे. येणारा काळ निवडणुकीचा आहे. जनतेला आपले कोण, संकटात कोण मदतीला येतो, विकासाच्या कामात कोण मदत करतो, याची सर्व माहिती व जाणीवही असते. जनतेचा आशीर्वाद सतत आपल्या सर्वांच्या पाठीशी राहिलेला आहे. तो कायम राहावा, यासाठी काम करीत राहा. प्रास्ताविक उद्धव खेडकर यांनी केले.

हेही वाचा..

नेवाशात 'माऊलीं'चा यात्रोत्सव रद्द

नेवासे : आषाढी वद्य एकादशीला श्री क्षेत्र नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात होणारा यात्रा उत्सव कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला असल्याचा निर्णय शुक्रवारी (ता. ३० ) ज्ञानेश्वर मंदिरात विश्वस्त मंडळ व प्रशासकीय अधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे यावर्षीही आषाढी वद्य वारी वारकऱ्यांविनाच होणार आहे.

संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थानचे प्रमुख विश्वस्त शिवाजी महाराज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस होते. संसंस्थानचे माजी अध्यक्ष व विश्वस्त अँड. माधवराव दरंदले, नवनिर्वाचित अध्यक्ष पांडुरंग अभंग, विश्वस्त विश्वासराव गडाख, ज्ञानेश्वर शिंदे, रामभाऊ जगताप, भिकाजी जंगले, पोलीस निरीक्षक विजय करे, नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड, नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप, प्रशासकीय अधिकारी रविंद्र गुप्ता, विश्वस्त कृष्णा पिसोटे, कैलास जाधव, गजानन दरदले, सतीश पिंपळे, आसिफ पठाण, महंमद आतार, संतसेवक आशिष कावरे, शिवा राजगिरे, जालिंदर गवळी उपस्थित होते.

शिवाजी देशमुख म्हणाले, "शासन नियमांचे पालन गेल्या दोन वर्षांपासून मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळाने आतापर्यंत केले आहे मागील वर्षीही यात्रा उत्सव व इतर होणारे धार्मिक कार्यक्रम खबरदारीचा उपाय म्हणून रद्द केले होते. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर संकट नको त्यातच भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासन आदेशाचे पालन म्हणून यावर्षी आषाढी वद्य वारीचा उत्सव रद्द करत असून या एकादशीला कोणीही माऊलींच्या दर्शनासाठी येऊ नये, दिंड्या देखील आणू नये तर घरी राहूनच माऊलींच्या प्रतिमेचे पूजन करून उपासनेच्या माध्यमातून घरच्या घरी साजरी करावी.``
 

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com