ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे आरक्षण गेले, भाजप करणार `आक्रोश`

आयोग स्थापन करून सर्वोच्च न्यायालयाकडे मुदत मागितली असती, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द करण्याची वेळ आलीच नसती.
Ram shinde.jpg
Ram shinde.jpg

नगर : ओबीसींचे (Obc) आरक्षण पुन्हा मिळवून देण्याकरिता राज्य सरकारला जाग आणण्यासाठी भाजपच्या वतीने आज (ता. 3) राज्यभर ‘आक्रोश’ आंदोलन करण्यात येणार आहे. नगरमध्येही अशा पद्धतीचे आंदोलन होईल, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे (Ram shinde) यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. (OBC's reservation was canceled due to Thackeray government's denial, BJP will do 'Akrosh')

‘न्यायालयाने वारंवार निर्देश देऊन व भाजपच्या पाठपुराव्यानंतरही ठाकरे सरकारकडून राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करण्यात चालढकल सुरू आहे. हा आयोग स्थापन करून सर्वोच्च न्यायालयाकडे मुदत मागितली असती, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द करण्याची वेळ आलीच नसती. मात्र, राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे.

शिंदे यांनी पत्रकात म्हटले आहे, की माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाच वेळा राज्य सरकारला पत्रे पाठविली होती; पण सरकार नेहमीप्रमाणे निष्क्रिय राहिले. त्यामुळे महाराष्ट्रात ओबीसींकरिता कोणतेही राजकीय आरक्षण शिल्लक राहिलेले नाही. जनगणना केल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही, असे सांगून आता दिशाभूल केली जात आहे. 

मागासवर्ग आयोग स्थापन करण्यातच राज्य सरकारने निष्काळजीपणा दाखविला. सर्वोच्च न्यायालयाने या निष्काळजीपणावरच बोट ठेवले आहे. समाजाचा विश्‍वासघात करणारे ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार हे आता मगरीचे अश्रू ढाळत असले, तरी या नामुष्कीस तेच जबाबदार असल्याने, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही प्रा. शिंदे यांनी पत्रकात केली आहे. 
 

हेही वाचा...

रुग्णसंख्या वेगाने लागली घटू; लसीकरणातही तालुक्‍याची आघाडी 

शिर्डी : कोविड प्रकोपाचा तीन महिन्यांचा काळाकुट्ट काळ इतिहासजमा होतोय. परिचितांच्या मृत्यूच्या बातम्याही आता कमी होऊ लागल्या आहेत. राहाता तालुक्‍यातील 75 टक्के गावांतून कोविडने गाशा गुंडाळायला सुरवात केलीय. संसर्गाचा दर तीन टक्‍क्‍यांवर घसरला. लसीकरणाने 65 हजारांचा टप्पा ओलांडला. हार्ड इम्युनिटीकडे पावले पडू लागलीत. तालुक्‍याच्या दृष्टीने ही "गुड न्यूज' आहे. 

खासगी कोविड सेंटर ओस पडलीत. लाट भरात असताना रोज तीनशेहून अधिक बाधित असायचे. आज पंधराशे चाचण्या झाल्या; बाधित होते केवळ 64. काल (ता. 31) सोळा गावांत एकही नवा रुग्ण नव्हता. 31 गावांतील रुग्णसंख्या एक आकडी आहे. 61पैकी 47 गावांतून कोविड गाशा गुंडाळतोय. राहाता शहरात गेल्या नऊ दिवसांत रोज सरासरी दीडशे चाचण्या केल्या; त्यांत केवळ दोन रुग्ण आढळले. शिर्डीची परिस्थितीही याहून वेगळी नाही. 
 

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com