radhakrushna vikhe 1.jpg
radhakrushna vikhe 1.jpg

ठरलं एकदाचं ! मराठा आरक्षणासाठी विखे पाटलांच्या नेतृत्त्वाखाली लढायचं

आमदारविखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संघटनांची समन्वय समिती स्थापन करण्यासही सर्वानी मान्यता दिली

नगर : आरक्षणाच्या संदर्भात मराठा  समाजातील सर्व संघटनांनी एका व्यासपीठावर येवून लढा देण्याचा निर्धार केला. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत पुढील आठवड्यात मुंबईमध्ये मराठा समाजातील सर्व लोकप्रतिनिधीची  बैठक बोलावून आंदोलनाची दिशा निश्चित करण्याचे ठरविण्यात आले. (Once upon a time! We used to fight for Maratha reservation under the leadership of Vikhe Patil)

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यात वेगवेगळी आंदोलन करणाऱ्या सर्व संघटनांना एका व्यासपीठावर येवून सरकारवर दबाव आणावा आशा केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मंगळवारी लोणी येथे मराठा समाजातील बहुतांशी संघटनांच्या उपस्थितीत आरक्षणाच्या संदर्भात विचारविनिमय करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर भविष्यातील लढाईची रणनीती ठरविण्यासाठी उपस्थित प्रतिनीधींनी महत्वपूर्ण सूचना करून त्याची एकत्रितपणे ठोस कृती राज्य आणि जिल्हा पातळीवर करण्यावरही या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. 

आमदार विखे पाटील यांनी सर्वाना एकत्रित येण्याचे केलेले आवाहन मराठा आरक्षणाच्या मागणीला नवे पाठबळ देणारे ठरेल. या माध्यमातून संघर्षाची नवी सुरूवात होत असल्याच्या भावना व्यक्त करतानाच आजपर्यत राज्यात मोर्चे निघाले कार्यकर्त्यांचे बळी गेले. आंदोलनाच्या केसेस कार्यकर्त्यांवर दाखल झाल्या परंतू समाजाच्या हाती काहीच पडले नाही त्यामुळेच भविष्यात विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षणाची कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई नियोजनबध्द पणे करण्याचा विचार सर्वच प्रतिनिधीनी या बैठकीत मांडला.एवढ्या वर्ष लढाई सुरू असतानाही मराठा समाजातील एकाही आमदार खासदाराने समाजाच्या एकजुटीबाबत आपली मत मांडली नाहीत. परंतू विखे पाटील यांनी घेतलेला पुढाकार महत्वपूर्ण असल्याने त्यांच्या आवाहानाला सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी आम्ही आलो असल्याचे छावा संघटनेचे नानासाहेब जावळे यांनी सांगितले. 

या बैठकीस समन्वयक महेश डोंगरे, अखिल भारतीय छावा संघटनेचे नानासाहेब जावळे, तुळजापुरचे शंभूराजे युवा काॅंतीचे सुनील नागने तसेच राज्यभरातून प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रतिनिधींनी आमदार विखे पाटील यांनीच आता समाजाची एकजूट घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी या वेळी केली.

विखे पाटील यांनी एकत्रित आलेल्या सर्व संघटनांच्या प्रतिनीधीचे अभिनंदन करून भविष्यात या न्याय मागणीसाठी सर्वाना बरोबर घेवून एका व्यासपीठावरून आता भविष्यातील लढाई करण्यावर शिक्कामोर्तब केले.

याचाच पहिला टप्पा म्हणून पुढील आठवड्यात मुंबईत समाजातील सर्व लोकप्रतिनिधीची एकत्रित बैठक आपण बोलाविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. आमदार विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संघटनांची समन्वय समिती स्थापन करण्यासही सर्वानी मान्यता दिली.

आंदोलन तसेच न्यायालयातील लढाई तसेच केंद्र आणि राज्य सरकारशी  समन्वय समितीच्या माध्यमातून चर्चा  करण्यासाठी  वेगवेगळ्या  समित्या गठीत करण्याचे निश्चित करण्यात आले.

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com