Sanjay raut.jpg
Sanjay raut.jpg

कितीही डोके आपटा महाविकास आघाडी भक्कमच : संजय राऊत यांचा भाजपाला टोला

कितीही नारायण राणे आले आणि गेले तरी पक्ष ताठ मानेने उभाच आहे. असे सांगून खासदार राऊत म्हणाले, की शिवसेना हा वाघाचा पक्ष म्हणून जन्माला आला असल्याने प्रत्येक काम आणि भुमिका वाघासारखीच राहणार आहे.

सोनई : "मी पुन्हा येईल, ही डरकाळी आता लांडगा आला रे लांडगा आला, या प्रमाणे झाली आहे. भाजपाने राजकारणाच्या भिंतीवर कितीही डोके आपटले, तरी महाविकास आघाडी सरकार पूर्ण पाच वर्ष टिकणार आहे," असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.  (No matter how many heads hit, Mahavikas Aghadi is strong: Sanjay Raut's tola to BJP)

शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने साकरलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाचे उदघाटन झाल्यानंतर आंबराई विश्रामगृह येथे झालेल्या शिवसंवाद कार्यक्रमात खासदार राऊत बोलत होते. शिवसैनिकांनी कितीही पक्ष बदलला, तरी त्याची शिवसैनिक म्हणून असलेली ओळख आजही कायम आहे. असे कितीही नारायण राणे आले आणि गेले तरी पक्ष ताठ मानेने उभाच आहे. असे सांगून खासदार राऊत म्हणाले, की शिवसेना हा वाघाचा पक्ष म्हणून जन्माला आला असल्याने प्रत्येक काम आणि भुमिका वाघासारखीच राहणार आहे. सत्ता आली असली तरी पक्षवाढ आणि सामाजिक कार्य सुरु ठेवायला अग्रक्रम द्या "

प्रास्ताविक शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी केले. अध्यक्षस्थानी खासदार सदाशिव लोंखडे होते. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, नगरच्या महापौर रोहिणी शेंडगे, माजी आमदार विजय औटी, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे सह पदाधिकारी व सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते. 

कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद नसल्याचे सांगितले. ही आघाडी यापुढे कायम टिकेल अशीच भुमिका आमची आहे. गुजरातच्या मदतीला धावून जाणारे पंतप्रधान अजूनही महाराष्ट्रातील अतिवृष्टी  बद्दल गुळणी धरुन आहेत. असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. 

आज नगर जिल्ह्याची ओळख साखर सम्राटाचा जिल्हा म्हणून आहे. यापुढे हा शिवसेनेचा जिल्हा म्हणून ओळख होण्यासाठी मंत्री गडाखांना ताकद देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

नार्वेकर, राऊत हे मुख्यमंत्र्यांचे कान-डोळा

सचिव मिलिंद नार्वेकर व खासदार राऊत मुख्यमंत्री ठाकरे यांचे कान आणि डोळा असून जिल्ह्यात पक्षाची ताकद अधिक वाढविण्यासाठी या दोघांनी जिल्हा दत्तक घ्यावा, असे मंत्री गडाख यांनी भाषणात सांगितले.

या वेळी  खासदार लोंखडे यांचे भाषण झाले. ऑक्सिजन प्रकल्प उदघाटन कार्यक्रमास जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले उपस्थित होते.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com