वाळुचा बेकायदा उपसा, दडपलेले मृत्यूंच्या आरोपांच्या चाैकशीचे मुश्रीफ यांचे आदेश

मृत्यूचे आकड्यात प्रशासनाने फसवेगिरी केल्याचेही आरोप झाले. व्यासपिठावर गंभीर विषयाच्या चर्चेत कुकडीच्या पाण्याचे राजकारणही रंगले आणि शेवटी मुश्रीम यांनीच चिमटे काढत वाळूचा बेकायदा उपसा आणि दडपलेले मृत्यू या आरोपांच्या चौकशीचे आदेश दिले.
Hasan mushrif 1.jpg
Hasan mushrif 1.jpg

श्रीगोंदे : कोरोनाआढावा घेण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीम (Hasan Mushrif) यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठक आज चांगलीच गाजली. स्थानिक अधिकाऱ्यांचे अनेकांनी कौतुक केले, तर काहींनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले. (Mushrif orders probe into allegations of illegal sand extraction, suppressed deaths)

मृत्यूचे आकड्यात प्रशासनाने फसवेगिरी केल्याचेही आरोप झाले. व्यासपिठावर गंभीर विषयाच्या चर्चेत कुकडीच्या पाण्याचे राजकारणही रंगले आणि शेवटी मुश्रीम यांनीच चिमटे काढत वाळूचा बेकायदा उपसा आणि दडपलेले मृत्यू या आरोपांच्या चौकशीचे आदेश दिले. 

शहरातील तुळशीदास मंगल कार्यालयात आज आढावा बैठक झाली. बैठकीला आमदार बबनराव पाचपुते, घनशाम शेलार, राहूल जगताप, राजेंद्र नागवडे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील, राजेंद्र क्षीरसागर, अण्णा शेलार, दीपक भोसले, हरिदास शिर्के, बाळासाहेब नाहाटा उपस्थित होते. 

प्रारंभी प्रांताधिकारी स्वाती दाभाडे यांनी कोरोनाचा आढावा घेतला. त्यावर राजेंद्र म्हस्के यांनी सांगितले की, मृत्यूदर अधिकारी दडवित आहेत. मोठ्या प्रमाणात माणसे मरत असताना प्रशासन ते दाखवित नसल्याने गंभीरता कमी होते. भोसले यांनी नदीपट्यातील गावात लशीकरण करण्याची मागणी करीत कोरोनाबाधित संख्या कमी दाखविल्याचा आरोप केला. 

नाहाटा यांनी प्रशासनाची लक्तरेच वेशीवर टांगली. प्रांताधिकारी व तहसीलदारांचे अत्यंत बोगस काम सुरु असून, त्यांच्या चौकशीची मागणी केली. खासगी कोविड सेंटर नसते, तर या अधिकाऱ्यांना लोकांनी बसू दिले नसते, असे सांगितले. 

कुकडीच्या पाण्याचा मुद्दाही बैठकीत चांगलाच गाजला. शेतीला पाण्याची गरज आहे. मात्र पाणी वेळेवर भेटत नसल्याने पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी झाली. 

आमदार पाचपुते यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक करतानाच, कोरोनात जास्त लोक मरण पावले असताना प्रशासन कमी दाखवित असून, नाहाटा यांच्या आरोपांचीही दखल घेण्याचे सुचविले. तालुक्यात आता पाण्यावर बोलणाऱ्यांची आणि काम करणाऱ्यांची संख्या वाढल्याने आपला ताण कमी झाल्याचा चिमटा त्यांनी काढला.

घनशाम शेलार यांनी पालकमंत्र्यांचे कौतुक करताना तालुक्यातील सुविधांना त्यांनी तातडीने झुकते माप दिल्याचा उल्लेख केला. जिल्हाधिकारी भोसले यांनीही पालकमंत्र्यांची स्तुती केली. 

पालकमंत्र्यांचे चिमटे आणि आदेश .....

मुश्रीफ म्हणाले, की कोरानाची पहिली लाट संपली नंतर लग्न निवडणुका वेगवेगळे समारंभ घेतले उन्माद केला. त्यामुळे दिसरी लाट जोरात येण्याची चाहूल आहे. पहिल्या दुसऱ्या लाटेत चुका तिसऱ्या लाटेत करुन जमणार नाही. कुकडी आवर्तनाबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना करणार आहे.

कोरोनातील मृ्त्यू दडविल्याच्या आरोपांची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करु. 
उपस्थितीतांची नावे वाचताना भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांचे नाव येताच, मंत्री मुश्रीफ मिस्किलपणे म्हणाले, शिवाजीराव नागवडे आमचे नेते व मित्र होते. त्यांचा मुलगा भाजपात कसा केला असे मी आत्ताच विचारले, त्यावर संदीप हे त्यांच्या भावकीतील आहेत, असे सांगण्यात आले. असे सांगत काढलेला चिमटा उपस्थितांची कोरोनाच्या गंभीर विषयातही दाद देवून गेला. 

वाळू चोरीची पालकमंत्र्यांची घेतली दखल

कोरोनात सामान्यांना घराबाहेरही पडू न देणारे प्रशासन नदीपात्रात वाळू उपसा करणाऱ्या जत्रेकडे दुर्लक्ष करतेच शिवाय कारवाईसाठी मुक्कामी थांबणारे तहसीलदार हात हलवित माघारी येतात. वाळूवाल्यांच्या पाठीशी कोण वरिष्ठ अधिकारी आहेत. या पत्रकारांच्या प्रश्नावर मंत्री मुश्रीम आश्चर्यचकित झाले. लिलाव असतानाच वाळूउपसा होता येथे उलटे असले, तर आपण याची चौकशी करु, असे स्पष्ट केले.

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com