ते आधुनिक काळातील कौरव ! भाजपच्या लोकांनी एका महिलेच्या वस्त्राला हात घातलाय

उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या दरम्यान भाजपच्या लोकांकडून एका महिलेचा अपमान झाला आहे. याबाबतचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या प्रकाराबाबत आमदार पवार यांनी ट्विट करून भाजपवर टीका केली आहे.
Rohit pawar1.jpg
Rohit pawar1.jpg

नगर : महाभारतात (Mahabharat) कौरवांनी द्रोपदीचे वस्त्रहरण केल्याचे आपणास माहिती आहे. पण कौरवांची वृत्ती आजही कायम असल्याचं दिसतंय. कारण उत्तर प्रदेशात एका महिला भगिनीच्या वस्त्राला भाजपच्या लोकांनी भर रस्त्यात हात घातलाय. हे आधुनिक काळातील कौरव तर नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित करून आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निषाणा साधला आहे. (That modern day Kaurava! BJP people have touched a woman's clothes)

उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या दरम्यान भाजपच्या लोकांकडून एका महिलेचा अपमान झाला आहे. याबाबतचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या प्रकाराबाबत आमदार पवार यांनी ट्विट करून भाजपवर टीका केली आहे.

हेही वाचा..

अभाविपच्या माध्यमातून परिषद की पाठशाला

संगमनेर : सुमारे दिड वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभुमिवर शाळा, महाविद्यालये बंद आहेत. आर्थिक परिस्थिती व अपुरे नेटवर्क या कारणामुळे बहुसंख्य विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा उपयोग करु शकत नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाण्याचा धोका संभवतो आहे. या पार्श्वभुमिवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने संगमनेर तालुक्यात परिषद की पाठशाला हा नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असून याला पालक व विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसादही मिळत आहे.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडून ठेवण्याच्या उद्देशाने, एक ते नऊ जुलै या कालावधीत 50 हुन अधीक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील सुमारे 15 ते 20 ठिकाणी दररोज 400 शालेय विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत आहे. या उपक्रमाद्वारे शालेय शिक्षणासह व्यावहारिक प्रशिक्षण, कौशल्य विकास, नवीन तंत्रज्ञान अशा अनेक विषयांचे धडे विद्यार्थी गिरवीत आहेत. तसेच कार्यकर्त्यांचेही प्रशिक्षण होत आहे.

यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांची शिक्षणातील रुची वाढण्यासाठी नाविन्यपूर्ण खेळ, गाण्यांचा समावेश या उपक्रमात करण्यात आला आहे. प्रार्थना, अभ्यासातील खेळ, गम्मत गोष्टी या अंतर्गत घेण्य़ात येतात. पसायदानाने पाठशालेचा शेवट होतो.
 

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com