आमदार लंकेंच्या कोविड सेंटरला सव्वा कोटींची देणगी, कोकणवासियांनी पाठविला हापूस

लंके प्रेमी कोककणवाशियांनी हापूस आंबे व माळवातील लोकांनी या कोविड सेंटरमधील रूग्णंसाठी तांदूळ पाठवून आपले लंके यांच्यावरील प्रेम दाखविले आहे.
Lanke and pawar.jpg
Lanke and pawar.jpg

पारनेर : राज्यातच नव्हे, तर देशात अन जगातही कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. हजारो कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत, या रूग्णांना दिलासा देण्यासाठी पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी भाळवणी येथे सुरू केलेल्या शरदचंद्र पवार कोविड (Covid Center) सेंटरसाठी तालुक्यातील जनतेबरोबरच देशविदेशातून तब्बल सव्वा कोटीं रूपयांची रोख मदत जमा झाली आहे. (MLA donates Rs 15 crore to Lankan's Kovid Center, Konkan residents send hapus)

लंके प्रेमी कोककणवाशियांनी हापूस आंबे व माळवातील लोकांनी या कोविड सेंटरमधील रूग्णंसाठी तांदूळ पाठवून आपले लंके यांच्यावरील प्रेम दाखविले आहे.
भाळवणी येथे उभारलेल्या कोविड सेंटरसाठी आमदार लंके दिवस रात्र झटत असून, रात्रंदिवस रूग्णांची सेवा करत आहेत. त्यांची अस्थेने विचारपूस करत वेळप्रसंगी तेथेच मुक्कमही करत आहेत.

14 एप्रील रोजी सुरू केलेल्या एक हजार शंभर बेडच्या या कोविड सेंटरमधून सुमारे आडीच हजारावर कोरोना रूग्ण उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी पोहचले आहेत.
आमदार लंके यांच्या या सामाजिक व सेवाभावी कामावर मतदारसंघा बरोबरच देशविदेशातील नागरीकांनी शिक्कामोर्तब केले आहे.

हेही वाचा..

कोविड सेंटरच्या उदघाटनाच्या पहिल्या दिवशीच सरकारी अधिकारी व कर्माचाऱ्यांनी मिळून 20 लाखाची देणगी जाहीर केली होती. त्यामुळे सरकारी यंत्रणेचा त्यांचा या सामाजिक कामाला पाठिंबा त्याच वेळी निश्चित झाला होता. दुसऱ्या दिवशीपासून तालुक्यासह जिलह्यातूनही मदतीचा ओघ सुरू आहे. औषधे, भाजीपाला, फळे , धान्य तर कोणी रूग्णांसाठी अंडी, सुकामेवा देऊन आपले सामाजिक दायीत्व व लंके यांच्या प्रती असलेले प्रेम व्यक्त करत आहेत.

लंके यांच्या कामाची किर्ती मिडियाच्या माध्यमातून सातासमुद्रापार गेली व त्यामुळे थेट देश विदेशातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. कोकणवासीयांनाही आमदार लंके यांच्या कामाची भुरळ पडल्याने त्यांनी हापूस आंबे, तर मावळातून तांदूळ या रूग्णांसाठी पोहच केला आहे.

या भेटीच्या मोबदल्यात कोकणवाशियांनी आमदार लंके यांना आमच्या कोकणात यावे लागेल, अशी गळ घातली व लंके यांनी कोरोना महामारी कमी झाल्यावर कोकणात येण्याचेच नव्हे, तर थेट तेथे एक दिवस मुक्कम करण्याचेही मान्यही केले आहे.

आमदार लंके यांनी भाळवणी येथे सुरू केलेले शरदचंद्रजी पवार कोविड सेंटर मध्ये भजनाच्या कार्यक्रमात कोरोना रूग्ण भजनात तल्लीन होऊन नाचत असल्याचे पाहून आपण येथे गोकुळ उभे केले आहे. लंके यांचे काम समाजाला आदर्श आहे. कोरोना रूग्णांच्यासेवेसाठी तेथेच कोविड सेंटरमध्ये झोपणाऱ्या आमदारांनी वेगळा असा राजकीय आदर्श निर्माण केला आहे.

पाॅझिटिव्ह नेतृत्त्वाने केले कोरोना निगेटीव्ह

पॉझिटिव्ह विचारांचे नेतृत्व असले, की जनतेतला कोरोना सहज निगेटिव्ह करता येतो. सत्ता संपत्ती व शस्त्र चंचल आहे, त्याचा योग्य वेळी योग्य कारणासाठी वापर करण्याचे शहाणपण ज्या नेतृत्वाला समजले त्यांचीच इतिहासाने नोंद धेतली आहे.

- गणेश शिंदे, व्याख्याते 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com