स्थिती हाताबाहेर गेल्याने लॉकडाऊन : तनपुरे - Lockdown due to out of hand situation: Tanpure | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

स्थिती हाताबाहेर गेल्याने लॉकडाऊन : तनपुरे

गाैरव साळुंके
रविवार, 9 मे 2021

लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी ज्या लोकांची नोंदणी झाली. व ज्यांना लस घेण्यासाठी आरोग्य विभागाने बोलविले त्यांनीच लसीकरण केंद्रावर जावेत.

श्रीरामपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची आकडेवारी वाढत आहे. दुसरा डोस लोकांपर्यंत वेळेत मिळाला पाहिजे. पहिला डोस घेतलेल्यांची तारखेनुसार यादी तयार करुन त्यांना दुसरा डोस देण्यासाठी प्रशासनामार्फत निरोप देण्यात येईल असे, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी सांगितले.  (Lockdown due to out of hand situation: Tanpure)

येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आज आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार लहू कानडे, प्रांताधिकारी अनिल पवार, मुख्याधिकारी गणेश शिंदे, गटविकास अधिकारी संजय दिघे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश बंड, पंचायत समिती सदस्या डॉ. वंदना मुरकुटे उपस्थित होत्या. तहसीलदार प्रशांत पाटील यांनी कोरोना परिस्थितीबाबत माहिती दिली. 

हेही वाचा..

कृषी शिक्षणासाठी नवीन धोरण

राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी ज्या लोकांची नोंदणी झाली. व ज्यांना लस घेण्यासाठी आरोग्य विभागाने बोलविले त्यांनीच लसीकरण केंद्रावर जावेत. लसीकरणाचा आलेख पहाता पुढील काही दिवस दुसरा डोस द्यावा लागेल. त्यानंतर 50 टक्के पहिला आणि 50 टक्के दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यासाठी प्रशासन बारकाइने नियोजन करीत आहे. जिल्हाभरात 15 मे पर्यत कडक लॉगडाऊन पाळणे गरजेचे आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्‍यात आणण्यासाठी नाईलाजाने लॉकडाऊन लागु करावा लागला. नागरिकांनी केवळ वीकेंडला प्रतिसाद न देता पुढील काही दिवस सर्वांनीच लॉकडाऊनचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

शिरसगाव येथील रुग्णालयात आॅक्सिजन प्लॅन्ट

राज्यात सर्वत्र एसडीआरएफ फंडातुन ऑक्‍सिजन निर्मिती प्लॅन्ट उभारत आहे. शिरसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात रोज 128 ऑक्‍सिजन सिलेंडरसाठी प्रकल्प उभारला जाईल. प्रक्रिया पुर्ण होवुन लवकरच ऑक्‍सिजन उपलब्ध होईल. 
- प्राजक्त तनपुरे राज्यमंत्री 

 

हेही वाचा..

कोविड सेंटरमध्ये ऑक्‍सिजन बेड वाढवणार ः डॉ. बोरुडे 

नगर : नगर शहरातील कोविड सेंटर व खासगी हॉस्पिटलमधील सुविधांची माहिती घेऊन कोरोना रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. प्रत्येक कोविड सेंटरमध्ये 20 ऑक्‍सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन महापालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे यांनी केले. 

नगर शहरातील विविध कोविड सेंटरला मनपा आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. बोरुडे, सदस्य निखिल वारे, संजय ढोणे, सतीश शिंदे आदींसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. डॉ. बोरुडे म्हणाले, लवकरच आरोग्य विभाग व प्रशासनाशी बैठक घेऊन आरोग्यसेवेच्या उपाययोजना केल्या जातील. आमदार संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आरोग्य समितीच्या मार्फत कोरोना रुग्णांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. 
 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख