वेळ पडल्यास जिल्ह्यातील ताकद दाखवू ! आमदार लंके यांचा खासदार डाॅ. विखेंना इशारा - Let's show the strength of the district when the time comes! MLA Lanka's MP Dr. Vikhenna gesture | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

वेळ पडल्यास जिल्ह्यातील ताकद दाखवू ! आमदार लंके यांचा खासदार डाॅ. विखेंना इशारा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 जुलै 2021

कोरोना काळात काहींनी दिखाऊपणा केला. रेमडेसिव्हिरचा काहींनी काळाबाजार केला. डिपॉझिट भरल्याशिवाय रुग्णालयात प्रवेश मिळणार नसल्याचे सांगितले.

टाकळी ढोकेश्वर : जिल्ह्यासह इतर भागातील १७ हजार रूग्णांना कोविड सेंटरच्या (Covid Center) माध्यमातून मोफत उपाचार दिला. जनतेचे कोट्यावधी रूपये वाचविले. काही रुग्णालयांत डिपॉझिट भरल्याशिवाय रूग्णांना प्रवेश दिला जात नाही. त्यांनी आमच्यावर टीका करू नये. प्रसंगी जिल्ह्यातील ताकद दाखवून देऊ, असा इशारा आमदार नीलेश लंके यांनी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांना दिला. (Let's show the strength of the district when the time comes! MLA Lanka's MP Dr. Vikhenna gesture)

पळशी येथे वनकुटे, तास,पळशी खडकवाडी, वडगाव सावताळ,देसवडे व मांडवे खुर्द गावांतील अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांना किराणा किट व अन्नधान्य वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

लंके म्हणाले, की कोरोना काळात काहींनी दिखाऊपणा केला. रेमडेसिव्हिरचा काहींनी काळाबाजार केला. डिपॉझिट भरल्याशिवाय रुग्णालयात प्रवेश मिळणार नसल्याचे सांगितले. भाळवणीमधील कोविड सेंटरमध्ये मात्र आम्ही रुग्णांना मोफत उपचार देऊन बरे केले. आमच्याकडे शिक्षण संस्था, रूग्णालय, कारखाना नसेल, मात्र प्रेम करणारी जनता मोठ्या संख्येत आहे, हे विसरू नका. चांगल्या कामावर टीका होणारच, मात्र ते आम्ही थांवणार आहोत. समाजासाठी अहोरात्र परिश्रम घेतच राहणार आहोत, असे लंके यांनी सांगितले.

 

हेही वाचा..

गावागावांत शिवस्मारके उभारण्याचा मानस

पारनेर : नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कळण्याची गरज आहे. त्यासाठी तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये शिवस्मारके उभारण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.

हंगे येथे लोकवर्गणीतून ५० लाख रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन, शिवस्मारक व्यायामशाळा व जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र चौधरी होते. जिल्हा परिषद सदस्य राणी लंके, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, माजी सभापती सुदाम पवार, कारभारी पोटघन, जितेश सरडे, डॉ. बाळासाहेब कावरे, सुवर्णा धाडगे, संजय लाकुडझोडे, सरपंच बाळासाहेब दळवी आदी उपस्थित होते.

लंके म्हणाले, ‘‘शिवाजी महाराजांचे विचार नव्या पिढीला कळावेत, यासाठी तालुक्यातील मुख्य गावांच्या बाजारपेठांत शिवस्मारके उभारण्याचा मानस आहे. बहिर्जी नाईक यांची हंगे ही जन्मभूमी. या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची गरज होती.’’

 

हेही वाचा..

मी बाप नाही, जनतेचा सेवक

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख