मी बाप नाही, तर जनतेचा सेवक आहे : आमदार नीलेश लंके यांचे औटींना प्रत्युत्तर - I am not a father, I am a servant of the people: MLA Nilesh Lanka's reply to Auti | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

मी बाप नाही, तर जनतेचा सेवक आहे : आमदार नीलेश लंके यांचे औटींना प्रत्युत्तर

मार्तंड बुचुडे
मंगळवार, 13 जुलै 2021

कोरोनाच्या महाभयंकार संकटात जी माणसे लपून बसली होती, ती आता बिळातून बाहेर पडली आहेत.

पारनेर : विधान सभेचे माजी उपसभापती विजय औटी (Vijay Auti) यांनी धोत्रे येथे एका उदघाटन प्रसंगी `मी सर्वांचा बाप आहे. कोणी कामात खो घालण्याचा प्रयत्न करू नये. गत आठवड्यात  विविध उदघाटनाच्या कार्यक्रम प्रसंगी आपण आमदार असतो, तर किमान ५० टक्के जीव वाचविले असते. तसेच तरूण पिढी बिघडविण्याचे काम सध्या सुरू आहे.`` असे औटी म्हणाले होते. त्यास आमदार नीलेश लंके यांनी, `मी बाप नाही, तर जनतेचा सेवक आहे व शेवट पर्यंतच जनसेवकच राहील,` असे टीकेला जोरदार प्रतीउत्तर दिले. (I am not a father, I am a servant of the people: MLA Nilesh Lanka's reply to Auti)

करंदी येथील एका विकास कामाच्या व माजी सभापती राहुल झावरे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रम प्रसंगी लंके बोलत होते. लंके यांनी औटी यांच्या टीकेला जोरदार  प्रती ऊत्तर दिले. लंके म्हणाले, मी समाजकारण व राजकारणात आल्यापासून मी माझे  जीवन जनतेसाठी अर्पण केले आहे. मी जर स्वतःला आमदार समजू लागलो, तर त्या दिवसांपासून माझी जनतेशी असलेली नाळ तुटलेली असेल, असे जबरदस्त ऊत्तर औटी यांचे नांव न घेता दिले. 

लपून बसलेली माणसे आता बिळातून बाहेर पडली

कोरोनाच्या महाभयंकार संकटात जी माणसे लपून बसली होती, ती आता बिळातून बाहेर पडली आहेत. ज्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे सुद्धा जीव वाचविता आले नाहीत कार्यकर्त्यांचे फोनही घेतले नाहीत, मदत तर दूरच राहिली. ते सामन्य जनतेसाठी काय करणार असाही प्रश्न या वेळी लंके यांनी उपस्थित केला.

मी काम हीच जनसेवा असे माणानारा आहे. कोरोना संसर्गाच्या दोनही लाटेत मोफत कोवीड सेंटर उभारून सर्वसामान्य जनतेला आधार देऊन सुमारे १७ हजार रुग्णांना कोरोनामुक्त केल्याचे माला समाधान वाटत आहे. जर कोरोना सेंटर उभारले नसते, तर या लोकांना किमान प्रत्येकी एक लख रूपये खर्च आला असता. मी मतदार संघात सुमारे शंभर कोटींहून अधिक रूपयांची विकास कामे मंजूर करून आणली आहेत. त्यांचे उद्घाटने करणे व नारळ फोडणे, यासाठीसुद्धा मला वेळ नाही. काहींना फक्त नारळ फोटण्याची हौस असते. ती त्यांनी करून घ्यावी. मला त्यांचे काहीच देणे घेणे नाही. संकटाच्या वेळी माजी आमदार नंदकुमार झावरे माझ्यापाठीशी उभे राहिले .त्यांचे   उपकार मी कधीच विसरणार नाही. झावरे यांनी तालुक्यात, सहकार, शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम उभे केले. सर्वसामान्य, शेतकरी, वंचित घटकांच्या प्रश्नांबाबत त्यांची तळमळ आजही कायम आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून माजी सभापती राहुल झावरे काम करीत असल्याचे आमदार लंके शेवटी म्हणाले. 
     

हेही वाचा..

भाजपमध्ये काय घडतेय

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख