खासदार सदाशिव लोखंडेंना जयंत पाटलांनी डावलले ! लोखंडेंची गुन्हा दाखल करण्याची मागणी

आम्ही कार्यक्रम घेताना आम्हाला नियमांची सरबत्ती केली जाते. आम्ही नियम पाळतो. मात्र आजनिळवंडे डाव्या कालव्यावरील आढळा जलसेतूचा कार्यक्रम झाला.
Lokhande and patil.jpg
Lokhande and patil.jpg

नगर : आम्ही कार्यक्रम घेताना नियम पुढे केले जातात. आज निळवंडेच्या डाव्या कालव्याच्या आढळा जलसेतूच्या कार्यक्रमप्रसंगी 100 पेक्षा जास्त लोक जमा झाले कसे. त्यांना नियम वेगळे आहेत का. आम्हाला या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नाही. सोशल डिस्टंसिचा फज्जा उडाला, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी केली. (खासदार सदाशिव लोखंडेंना जयंत पाटलांनी डावलले ! लोखंडेंची गुन्हा दाखल करण्याची मागणी Jayant Patil defeats MP Sadashiv Lokhande! Demand for filing an iron ore case)

`सरकारनामा`शी बोलताना लोखंडे म्हणाले, की आम्ही कार्यक्रम घेताना आम्हाला नियमांची सरबत्ती केली जाते. आम्ही नियम पाळतो. मात्र आज निळवंडे डाव्या कालव्यावरील आढळा जलसेतूचा कार्यक्रम झाला. जलसंपदामंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे यांच्यासह आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी पाहणी दौरा केला. दौऱ्यावेळी सर्व अधिकारी आणि कार्यकर्ते मिळून १०० पेक्षा अधिक लोक जमले. त्यामुळे या प्रकरणी कार्यकारी अभियंते गिरीश संघाणी व अधीक्षक अभियंते अरुण नाईक यांची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करायला हवेत. या पाहणी दौऱ्यावेळी सोशल डिस्टंसिंगची कोणतीही काळजी घेण्यात आली नससल्याचाही आरोप त्यांनी केला.

कार्यक्रमाला निमंत्रण कसे नाही

दरम्यान, शिवसेनेचे खासदार असूनही आजच्या कार्यक्रमांना त्यांना निमंत्रण दिले नाही. त्यावरून ते चिडले. आमच्याच मतदारसंघात कामे होत असताना निमंत्रण दिले जात नाही. हे योग्य नाही. आम्ही कोणतेही कार्यक्रम घेताना अधिकारी नियम पुढे करतात. मंत्र्यांच्या कार्यक्रमात मात्र कितीही गर्दी झाली, तरीही तेथे नियम कुठे जातात. त्यामुळे हा भेदभाव नको. आमदार, खासदार किंवा मंत्री असो नियम सर्वांनी सारखेच असतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी भेदभाव करू नये. या प्रकाराची तातडीने चाैकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी खासदार लोखंडे यांनी केली आहे.

हेही वाचा..

सव्वासहा लाख जणांचे जिल्ह्यात लसीकरण 

नगर : जिल्ह्यात आजअखेरपर्यंत सव्वासहा लाख जणांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आलेले आहे, अशी माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. 

जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये सुरवातीला फ्रंटलाइ वर्कर यांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 45 वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. तिसऱ्या टप्प्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाचा टप्पा सुरू करण्यात आलेला होता; मात्र लसींचा तुटवडा जाणवू लागल्याने हे लसीकरण सध्या थांबविण्यात आलेले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, महसूल, पोलिस, पंचायतराज, गृह व शहरी कामकाज, रेल्वे सुरक्षा दल, ज्येष्ठ नागरिक, अशा एकूण पाच लाख 62 हजार 249 जणांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती. त्यांतील चार लाख 82 हजार 39 जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आलेला आहे. एक लाख 34 हजार 221 जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आलेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात पहिला व दुसरा डोस एकूण सहा लाख 15 हजार 260 जणांना देण्यात आलेला आहे. 

जिल्ह्यात सध्या लसींचा तुटवडा जाणवू लागलेला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण थांबविण्यात आलेले आहे. मात्र, लस घेण्यासाठी नागरिकांची रीघ लसीकरण केंद्रांवर रोज लागत आहे. 

लसीकरणाच्या पहिल्या डोसची टक्केवारी 85.73, तर दुसऱ्या लसीकरणाच्या डोसची टक्केवारी 23.87 आहे. 

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com