जामखेडची स्थिती बिकट, अखेर दहा दिवस "जनता कर्फ्यू'

जामखेड शहरात कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत असताना, मृत्यूंच्या संख्येतही वाढ होत आहे. शासनाने संचारबंदी लागू केली असली, तरी काही प्रमाणात शिथिलता दिली आहे.
Corona1.jpg
Corona1.jpg

जामखेड : शहरात कोरोनाबाधितांची (Covid-19) संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिस्थिती बिकट होत असताना आज प्रांताधिकारी अर्चना नष्टे (Archana Naste) यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यांसमवेत पार पडलेल्या बैठकीत, शहरात 10 ते 20 मेदरम्यान कडकडीत "जनता कर्फ्यू' सर्वांच्या संमतीने जाहीर करण्यात आला. (Jamkhed situation worsens, ten days 'public curfew')

या वेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सूर्यकांत मोरे, सुरेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांच्यासह व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. 

जामखेड शहरात कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत असताना, मृत्यूंच्या संख्येतही वाढ होत आहे. शासनाने संचारबंदी लागू केली असली, तरी काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. जामखेडकरांकडून शासनाच्या सौजन्याचादेखील गैरफायदा घेतला जात असून, रस्त्यावर गर्दी होत असल्याने उद्देश सफल होत नाही. त्यामुळे शहरातील स्थानिक व्यापाऱ्यांच्या पुढाकाराने प्रांताधिकारी अर्चना नष्टेंच्या उपस्थितीत "जनता कर्फ्यू' पाळण्याचा निर्णय सर्वानुमते झाला.

कृषी सेवा केंद्रे व किराणा दुकानांसाठी बाहेरगावांहून माल घेऊन येणाऱ्या मालवाहतुकीच्या मोठ्या वाहनांना माल उतरविण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. उद्या (शनिवार) व रविवारी सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यात येणार असून, पुढील 10 ते 20 मेदरम्यान अत्यावश्‍यक सेवा दिवसभर व दूधविक्री सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. 

गेल्या वर्षी शहरात कोरोना थोपविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले. मात्र, या वर्षी परिस्थिती भयानक आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, व्यापार, उद्योग संघटनांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येण्याची गरज आहे. दहा दिवस स्वयंस्फूर्तीने "बंद' पाळून "जनता कर्फ्यू'त सहभागी व्हावे, असे आवाहन प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी जनतेला केला आहे. 

शासनाच्या नियमांचे पालन करावे

तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांनी स्वत:च्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, तसेच पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. 
- विशाल नाईकवाडे, तहसीलदार 

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com