कोपरगावात लसीकरण पोलिस बंदोबस्तात, आरोग्य कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

शासनाने तातडीने संरक्षण द्यावे, तरच लसीकरण सुरू करू, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला. अखेर पोलिस बंदोबस्तात लसीकरण सुरू करण्यात आले.
Kopargaon.jpg
Kopargaon.jpg

कोपरगाव : तालुक्‍यातील ग्रामीण रुग्णालयात नागरिकांनी (Public) लसीकरणासाठी तोबा गर्दी केली. यामुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या शासकीय नियमाचा फज्जा उडाला. त्यामुळे संतप्त नागरिकांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना (Workers) धक्काबुक्की करण्यात आली. (Vaccination in Kopargaon under police protection, pushing health workers)

शासनाने तातडीने संरक्षण द्यावे, तरच लसीकरण सुरू करू, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला. अखेर पोलिस बंदोबस्तात लसीकरण सुरू करण्यात आले. 

ऑनलाइन नोंदणी केलेल्या 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी येऊन टोकन घ्यावे, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयातर्फे करण्यात आले होते. नागरिकांनी टोकन घेण्यासाठी पहाटे चारपासून ग्रामीण रुग्णालय आवारात गर्दीचा उच्चांक केला. त्यातून सामाजिक अंतर व मास्कचा वापर या नियमांना सर्रास तिलांजली दिली गेली. नागरिक कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. आरोग्य विभागाच्या नियोजनाच्या अभावाचा त्रास आम्हाला सहन करावा लागत आहे. पहाटे उभे राहूनही आम्हाला लस मिळेल की नाही, याबाबत कोणी काहीही सांगत नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. 

पूर्वीची ऑनलाइन नोंदणी पद्धत योग्य 

ग्रामीण रुग्णालयात किंवा ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी गर्दी होऊन, त्यातून कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाला नियोजनाबाबत काही तरी ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे. पूर्वीची जुनी ऑनलाइन नोंदणीची पद्धत योग्य होती, असे काहींचे मत आहे. 

हा वाईट अनुभव

रुग्णालयाच्या आवारात लस कोणत्या वयोगटातील नागरिकांना देण्यात येणार, हे फलकावर लिहिले. मीडियाच्या माध्यमातून आवाहन केले तरी 44 वर्षांवरील नागरिकांनीदेखील गर्दी केली. आरोग्य कर्मचाऱ्यांचे न ऐकता धक्काबुक्की करण्यात आली. हा वाईट अनुभव आला. 
- सचिन जोशी, आरोग्य कर्मचारी 

हेही वाचा...

हेही वाचा...

प्रभागनिहाय लसीकरण केंद्रे सुरू करा

कोपरगाव : कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आज लसीकरणासाठी मोठी गर्दी झाली. या पार्श्‍वभूमीवर पालिकेने प्रभागनिहाय खासगी डॉक्‍टरांची नेमणूक करून लसीकरण केंद्रे स्थापन करून नागरिकांना लस द्यावी, अशी मागणी नगरसेवक कदम यांनी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मागील वर्षभरापासून नगरसेवक जनार्दन कदम प्रभाग दोनमधील नागरिकांची कुटुंबातील सदस्यांसारखी काळजी घेत आहेत. आता त्यांनी संपूर्ण प्रभागातील नागरिकांच्या लसीकरणाचा ध्यास घेतला आहे. नागरिकांना समता नागरी पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com