नगरला कोरोना बाधितांचा उच्चांक, एकाच दिवशी 4595 रुग्ण

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असले, तरी रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. शुक्रवारीबाधितांच्या आकड्याने नवा विक्रम केला असून, साडेचार हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
corona.jpg
corona.jpg

नगर : जिल्ह्यात कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असले, तरी रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. शुक्रवारी बाधितांच्या आकड्याने नवा विक्रम केला असून, साडेचार हजारांचा टप्पा ओलांडला आहे. (The highest number of corona cases in the city, 4595 patients in a single day) 

जिल्ह्यात आजअखेरपर्यंत दोन लाख दोन हजार 375 बाधित आढळून आले आहेत. त्यांतील एक लाख 73 हजार 104 जण बरे होऊन घरी परतले आहेत. आजअखेर एकूण दोन हजार 262 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 27 हजार नऊ जणांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. आज (शुक्रवारी) दिवसभरात चार हजार 594 नवीन रुग्ण आढळून आले, तर तीन हजार 856 जण बरे होऊन घरी परतले.

जिल्हा रुग्णालयातील तपासणी अहवालात एक हजार नऊ, खासगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात दोन हजार 665, अँटिजेन चाचणीत 920 जण बाधित आढळून आले. 

हेही वाचा...

तालुकानिहाय आढळून आलेले रुग्ण 
नगर शहर ः 732, नगर ग्रामीण ः 463, श्रीगोंदे ः 425, संगमनेर ः 381, राहाता ः 315, राहुरी ः 287, कोपरगाव ः 277, श्रीरामपूर ः 247, पारनेर ः 230, शेवगाव ः 212, नेवासे ः 207, अकोले ः 187, कर्जत ः 180, पाथर्डी ः 132, परजिल्ह्यातील 126, जामखेड ः 106, भिंगार कॅंटोन्मेंट ः 61, मिलिटरी हॉस्पिटल ः 18, परराज्ये ः आठ. 

निंबळकला दहा दुकानांवर कारवाई 

निंबळक येथे "लॉकडाउन' काळात कोरोना समितीने नियम मोडणाऱ्या दहा दुकानदारांवर प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची कारवाई केली. नियम मोडणाऱ्या दुकानदारांनी पुन्हा दुकान उघडले, तर गुन्हे दाखल करण्याचा इशारा सरपंच प्रियांका लामखडे यांनी दिला. 

गावातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्‍यात आणण्यासाठी ग्रामपंचायतीच्या कोरोना समितीने 11 मेपर्यंत गाव "लॉकडाउन' केले आहे. वैद्यकीय सेवा व दूध डेअरी वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाही काही दुकानदार व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे कोरोना समितीने तपासणी करून दहा दुकानदारांवर प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची कारवाई केली. पुन्हा दुकान उघडल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला.

कोरोनाची लक्षणे असणाऱ्यांनी विलगीकरण कक्षात दाखल व्हावे. अशी व्यक्ती गृहविलगीकरणात आढळली, तर तिच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. बाधित व्यक्ती बाहेर फिरत असल्याचे दिसल्यास तत्काळ माहिती देण्याचे आवाहन समितीने केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com