विखे पाटील यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या कोविड सेंटरला मदतीचा ओघ - Help flow to Kovid Center started through Vikhe Patil's initiative | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

विखे पाटील यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या कोविड सेंटरला मदतीचा ओघ

सरकारनामा ब्युरो
रविवार, 16 मे 2021

लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या प्रवरा कोविड सेंटरसाठी मदतीचा ओघ सुरू आहे.

शिर्डी : लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या प्रवरा कोविड सेंटरसाठी मदतीचा ओघ सुरू आहे. काल दिवसभरात 3 लाख 81 हजारांचे धनादेश जमा झाले. 

याबाबत समन्वयक डॉ. धनंजय धनवटे म्हणाले, ""डॉ. विखे पाटील साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब कडू आणि डॉ. संजय कडू यांनी 51 हजार, ज्ञानदेव आणि बाळासाहेब भगवंत आहेर यांनी 50 हजार रुपये, किरण आहेर 10 हजार रुपये, सुनील व अनिल नानासाहेब आहेर 11 हजार, भाऊसाहेब चंद्रभान कडू 51 हजार, प्रसाद म्हस्के यांनी 51 हजार, शिरूर येथील शुभांगी गणेश पाचर्णे परिवाराने 51 हजार, उमेश घोलप 51 हजार, लोणीतील आमदार राधाकृष्ण विखे पाटील मित्रमंडळातर्फे 51 हजार आणि प्रभाकर विखे यांनी पाच हजारांच्या मदतीचा धनादेश दिला आहे. 

पाथरे ग्रामस्थांतर्फे केळी आणि बिस्किटे व बाटलीबंद पाणी देण्यात आले. शंकर तांबे, संतोष कडू, हरिभाऊ घोगरे, दादासाहेब दवणे, बापूसाहेब कांडेकर यांनी बेड साइड लॉकर भेट दिले. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, प्राचार्य प्रदीप दिघे, डॉ. किरण आहेर व डॉ. नीलेश पारखे यावेळी उपस्थित होते. 

सरकारी यंत्रणेवरील ताण कमी व्हावा

गावोगावच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर लक्ष ठेवावे. लक्षणे असलेल्या रुग्णांची चाचणी करून त्यांना त्वरित कोविड सेंटरमध्ये भरती करावे. सरकारी यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा. 
- राधाकृष्ण विखे पाटील, आमदार 

 

हेही वाचा..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हारमध्ये रक्‍तदान शिबिर 

कोल्हार : कोरोनाच्या हाहाकाराने सर्वत्र धास्तीचे वातावरण असतानाही, कोल्हारमधील एका धाडसी युवतीने रक्तदान करून रक्तदान हेच जीवनदान असल्याचा आदर्श इतरांपुढे ठेवला आहे. तिची ही उत्स्फूर्त सामाजिक जाणीव सर्वांसाठी अनुकरणीय अशीच ठरली आहे. श्रद्धा अनिल राजभोज हे एकमेव अशा रक्तदात्या युवतीचे नाव आहे. तिच्या भावानेही रक्तदान केले. 

हेही वाचा..

जामखेडला होणार आॅक्सिजन प्लॅन्ट

कोल्हार भगवतीपूर (ता. राहाता) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोल्हार भगवतीपूर उपखंडातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. श्री भगवतीदेवी मंदिराच्या भक्त निवासात झालेल्या या शिबिरात 67 जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले. 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या शिबिरात आवश्‍यक ती सर्व प्रकारची खबरदारी व काळजी घेण्यात आली. रक्तपेढीने निर्देशित केलेल्या सर्व सूचनांचे पालन करण्यात आले. नगर येथील जनकल्याण रक्तपेढीचे प्रमुख डॉ. विलास मढीकर व डॉ. वसंत झेंडे यांनी रक्तदानासंबंधी मार्गदर्शन केले. डॉ. मढीकर म्हणाले, ""राज्यात 350 रक्तपेढ्या असून, त्यांपैकी 14 रक्तपेढ्या नगर जिल्ह्यात आहेत. रक्तपेढ्यांच्या तुलनेत रक्तदात्यांनी कमतरता आहे. रक्तदान करण्यासाठी सामाजिक व सेवाभावी संस्थांनी उत्स्फूर्त पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. संघाचे माजी जिल्हा संघचालक डॉ. जयराम खंडेलवाल अण्णासाहेब कदम पाटील शेती व ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव शिवाजी उदावंत आदींनी शिबिरासंबंधी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टने शिबिरासाठी सहकार्य केले. 
 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख