आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नातून जामखेडला होणार ऑक्‍सिजन प्लॅंट

कामाचा संबंधित एजन्सीला मिळाला कार्यारंभ आदेश मिळाला आहे. प्रत्यक्षात दोन दिवसांत या कामाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा केला होता.
Rohit pawar.jpg
Rohit pawar.jpg

जामखेड : कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्याने बेड व ऑक्‍सिजनची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे ऑक्‍सिजनचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. आता कर्जतपाठोपाठ जामखेड येथेही ऑक्‍सिजन प्लॅंट सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. (An oxygen plant will be set up in Jamkhed through the efforts of MLA Rohit Pawar)

या कामाचा संबंधित एजन्सीला मिळाला कार्यारंभ आदेश मिळाला आहे. प्रत्यक्षात दोन दिवसांत या कामाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा केला होता. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्‍सिजनचा तुटवडा निर्माण होत असल्याने रुग्णांचे मोठे हाल झाले. प्लॅंट उभारण्यासाठी लागणारा खर्च तब्बल दीड कोटीच्या घरात असल्याने खासगी हॉस्पिटल चालक पुढे आले नाहीत. मागील महिन्यात जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील सात ठिकाणी ऑक्‍सिजन प्लॅंट सुरू करण्या संदर्भात कार्यअरंभ आदेश दिले होते. या महिन्यात 5 मे रोजी अकोले आणि कोपरगाव करिता, तर 9 मे रोजी जामखेड करिता पुणे येथील फायरवॉल टेक्‍नोलॉजी या कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांमध्ये ऑक्‍सिजन प्लॅंटची उभारणी जवळपास पूर्ण होणार आहे. 

हेही वाचा...

जामखेड येथे होणाऱ्या ऑक्‍सिजन प्लॅंटमधून प्रतिदिनी 660 एलपीएम ऑक्‍सिजन तयार होणार आहे, तर सरासरी 125 सिलिंडर प्रतिदिनी भरले जाणार आहेत. या प्रकल्प उभारणीचा प्रारंभ एक दोन दिवसांत जामखेडला होणार आहे. सर्वांत महत्त्वाच्या प्रकल्पाकरिता दोनशे केव्ही क्षमतेचा ट्रान्सफार्मर उभारणे गरजेचे असून, यासंदर्भात तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी वीज मंडळाशी पत्रव्यवहार केल्याचे समजते. हा प्रकल्प उभारणी करीता अडीच हजार स्क्वेअर फूट जागेची गरज असून, ही जागा ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरामध्ये उपलब्ध आहे. 

हेही वाचा...

जिल्ह्यात पाच दिवस ढगाळ वातावरण 

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान विभागाने जिल्ह्यात पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्‍यता वर्तविली आहे.

ता. 15 ते 18 दरम्यान जोराचे वारे व विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. पावसाची शक्‍यता असल्याने, कापणी केलेली पिके शेडमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवावीत. पिकांची काढणी शक्‍यतो सकाळच्या वेळेतच पावसापूर्वी करून घ्यावी. वादळी वाऱ्याची शक्‍यता असल्याने, फळपिकांचे संरक्षण करण्यासाठी बांबू किंवा लाकडी काड्यांचा आधार देऊन, प्लॅस्टिक दोरीच्या साहाय्याने झाडे एकमेकांना बांधून घ्यावीत. पावसाच्या शक्‍यतेमुळे विद्युत उपकरणांचा संपर्क टाळावा. हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला व हवामानाच्या पूर्वानुमानाकरिता "मेघदूत' मोबाईल ऍपचा वापर करावा, तसेच विजेच्या अंदाजाच्या पूर्वानुमानाकरिता "दामिनी' मोबाईल ऍपचा वापर करावा, असे कळविण्यात आले आहे. 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com