मराठा आरक्षणासाठी बळी गेलेल्यांना वारसांना नोकरी द्या : आमदार राजळे

मराठा आरक्षणासाठी जे बळी गेले त्यांच्या वारसांना नोकरीत समावुन घ्या. मराठा मोर्चेक-या विरुद्धचे गुन्हे मागे घ्या.
Monika rajale.jpg
Monika rajale.jpg

पाथर्डी : मराठा आरक्षणासाठी जे बळी गेले त्यांच्या वारसांना नोकरीत समावुन घ्या. मराठा मोर्चेक-या विरुद्धचे गुन्हे मागे घ्या, अशी मागणी आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांनी केली.(Give jobs to the heirs of those who fell victim to Maratha reservation: MLA Rajale)

येथील विठोबारेजे लाँन्स येथे मराठा आरक्षणाबाबत बैठक झाली. आमदार राधाकृष्ण विखे पाटील, अरूण मुंडे, माणिक खेडकर, अभय आव्हाड, काशिनाथ लवांडे, नंदकुमार शेळके, सुनिल ओव्हळ, अजय रक्ताटे, सुभाष ताठे, रवींद्र वायकर उपस्थित होते.

राजळे म्हणाल्या, की मराठा समाज शेतीवर अंवलबुन असल्याने त्यांची अवस्था खुप नाजुक झाली आहे. आरक्षण देवुन समाजाला उन्नत अवस्थेत आणावे लागेल. आरक्षणाच्या लढ्यात आम्ही जनेतसोबत होतो आणि आताही अहोत. महाआघाडी सरकारचे अपय़श ते दुस-याला दोष देत आहेत. आम्ही महायुतीच्या काळात आरक्षण दिले होते ते टिकवता आले नाही. आता आरक्षण मिळालेच पाहिजे त्यासाठी लढा उभारण्यासाठी एकत्रीत या.

या वेळी विखे पाटील म्हणाले, की मराठा समजाला देवेंद्र फडणवीस दिले होते. महाआघाडीच्या सरकारला ते न्यायालयात टिकवता आले नाही. केंद्र सरताने एकशे दोनवी घटना दुरुस्ती केली आहे. राज्यसरकारने फेरयाचीका दाखल करायला हवी होती ती केली नाही. अंदोलनाशी दिशा ठरवुन मराठा समाजाला आरक्षण मिलेपर्यंतच्या लढ्यात भारतीय जनता पक्ष मराठा समाजासोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण यांना टिकता आले नाही. महाआघाडीसरकार स्वतःचे अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारला दोष देवुन जनतेची दिशआभुल करतेय. छत्रपती संभाजी राजेंनी मराठा आरक्षणासाठी लढा उभारण्याची घोषणा केली आहे. ज्या संघटना आरक्षणासाठी लढत आहेत भारतीय जनता पक्ष त्यांच्या सोबत राहणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा..


 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com