कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी पंतप्रधानांची खास योजना लाभदायी

मुलांच्यावयाच्या 18 व्या वर्षी मासिक निर्वाहभत्ता, 23 व्या वर्षी त्यांना 10 लाख रुपये, मोफत शिक्षण, उच्च शिक्षणासाठीच्या कर्जाचे व्याज तसेच आयुष्यमान भारत अंतर्गत 18 व्या वर्षापर्यंत पाच लाखांचा विमा काढण्यात येणार.
radhakrushna vikhe 1.jpg
radhakrushna vikhe 1.jpg

संगमनेर : कोविडच्या (Corona) दुर्दैवी संकटात मृत्यू पावलेल्या पालकांच्या मुलांसाठी पंतप्रधानांची योजना लाभदायी आहे. त्यानुसार मुलांच्या वयाच्या 18 व्या वर्षी मासिक निर्वाहभत्ता, 23 व्या वर्षी त्यांना 10 लाख रुपये, मोफत शिक्षण, उच्च शिक्षणासाठीच्या कर्जाचे व्याज तसेच आयुष्यमान भारत अंतर्गत 18 व्या वर्षापर्यंत पाच लाखांचा विमा काढण्यात येणार असून, त्याचे हप्त पीएम केअर फंडातून अदा होणार आहेत. या योजनेमुळे अनाथ बालकांचे भविष्य घडणार असल्याचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. (The PM's special scheme is beneficial for children who have lost their parents due to corona)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ कोवीड योद्ध्यांच्या कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने आश्वी व जोर्वे येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

विखे पाटील म्हणाले, की कोविडच्या संकटात आपले माता पिता किंवा पालक गमावलेल्या मुलांसाठी सामाजिक बांधिलकीतून केंद्र सरकारने पीएम केअर फंडातून सुरु केलेल्या योजनेमुळे यामुलांचे भविष्य घडण्यास मोठी मदत मिळणार आहे. मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाली असल्याने आनंदोत्सव करण्याऐवजी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सेवा ही संघटन या कार्यक्रमाचे देशभर आयोजन करून कोवीड योध्द्यांनी केलेल्या कामाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा उपक्रम शिर्डी मतदारसंघात आयोजित केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देशात कोविडचे थैमान सुरु असताना पंतप्रधान मोदींनी अतिशय धैर्याने परिस्थितीवर मात केली. पहिल्या लाटेत आत्मनिर्भर योजना जाहीर करून देशातील सामान्य माणसाला आधार दिला. आता दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनसह आरोग्याची साधने त्यांनी उपलब्ध करून दिली. आपल्या संबंधाचा उपयोग करुन इतर देशातूनही भारताला मदतीसाठी पुढे आलेले हात मोदींच्या द्रष्ट्या नेतृत्वाची साक्ष देत असल्याचे गौरोवोद्गार त्यांनी काढले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागात रूग्णांची संख्या अचानक वाढली. रूग्णालय उपलब्ध होत नव्हते अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील कोविड योध्द्यांनी उपलब्ध साधनातून अनेकांचे प्राण वाचवले. यांच्यामुळे ग्रामीण भाग सुरक्षीत राहिला. मात्र धोका अद्यापही टळला नाही त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

या वेळी प्रातिनिधिक स्वरुपात प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसिलदार अमोल निकम, वैद्यकिय अधिकारी डॉ. तय्यब तांबोळी, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे आदींसह आशा सेविका व परिचारीका तसेच खासगी डॉक्टरांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बापुसाहेब गुळवे, विठ्ठलराव गायकवाड, भगवानराव इलग, रखमा खेमनर, रामभाऊ भुसाळ, अॅड. रोहिणी निघुते, दीपाली डेंगळे, निवृती सांगळे, बाळासाहेब भवर, सतिश कानवडे, शिवाजीराव कोल्हे दिलीप इंगळे, गोकूळ दिघे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

कोविड केअर सेंटरची पाहणी

आमदार विखे यांनी प्रशासकिय अधिकाऱ्यांसमवेत मांची हिल व जोर्वे येथील कोविड केअर सेंटरची पहाणी करुन आश्वी पंचक्रोशीतील गावांना दिलासा देणाऱ्या या सेंटरविषयी समाधान व्यक्त केले. तसेच भाजपाच्या वतीने रुग्णांसाठी बिस्कीटांचे वाटप करण्यात आले.

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com