अडीचशे वर्षांपूर्वी अहिल्यादेवींनी बांधलेला घाट चाैंडीत नदीच्या खोलीकरणात सापडला

या घाटाच्या पायऱ्यांची आमदार पवारांनी स्वच्छता करून पूजा केली.आमदार पवारांनी तालुक्‍यातील 21 गावांमध्ये जलसंधारणाची कामे हाती घेतली आहेत. यात चौंडीचाही समावेश आहे.
Jamkhed 1.jpg
Jamkhed 1.jpg

जामखेड : आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या पुढाकाराने मागील आठवडाभरापासून चौंडी येथे सीना नदीपात्राच्या खोलीकरणाचे काम सुरू आहे. अडीचशे वर्षांपूर्वी नदीपात्रालगत अहिल्यादेवींनी बांधलेला व मातीखाली बुजलेला जुना घाट काम सुरू असताना सापडला आहे. या घाटाच्या पायऱ्यांची आमदार पवारांनी स्वच्छता करून पूजा केली. 
आमदार पवारांनी तालुक्‍यातील 21 गावांमध्ये जलसंधारणाची कामे हाती घेतली आहेत. यात चौंडीचाही समावेश आहे. (The ghat built by Ahilya Devi two and a half hundred years ago was found in the deepening of the river Chandit)

येथील सीना नदीपात्राच्या खोलीकरणाच्या कामास आमदार पवार यांच्या मातुःश्री सुनंदा पवार यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला होता. या कामास पवार यांचे वडील राजेंद्र यांनीही भेट दिली होती. नदीपात्राचे खोलीकरण करताना निघालेला गाळ शेतीला उपयुक्त ठरत असल्याने, परिसरातील शेतकऱ्यांनी गाळ उचलण्यास प्रतिसाद दिला. नदीपात्र खोलीकरणादरम्यान मातीखाली बुजलेल्या पायऱ्या आढळून आल्या. जसजसे खोदकाम करण्यात आले, तसतसा अनेक वर्षांपासून मातीखाली दबलेला घाट वर आला. 

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी (ता. जामखेड) येथील जन्मस्थळाला आमदार पवार यांनी जयंतीउत्सवाच्या पूर्वसंध्येला भेट दिली. येथील अहिल्यादेवींचा वाडा, अहिल्येश्‍वर मंदिर, चौंडेश्‍वरी मंदिर, नक्षत्र उद्यान, महादेव मंदिर परिसरातील सीना नदीपात्राच्या दिशेने बांधलेल्या घाटाला भेट दिली. अडीचशे वर्षांपूर्वी अहिल्यादेवींनी हा घाट बांधला होता. मात्र, नदीपात्र उथळ होत गेल्याने घाट मातीखाली बुजला होता. तो वर आल्याने, त्याची स्वच्छता करून आमदार पवार यांनी पूजा केली. 


काशी येथून आणला होता दगड 

विशेष म्हणजे, या घाटासाठी वापरलेला दगड व येथील अहिल्येश्‍वराच्या मंदिरासाठी वापरलेला दगड एकच आहे. सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी अहिल्यादेवींनी हा दगड काशी येथून आणून मंदिर व घाट बांधल्याचे सांगण्यात येत आहे. 

हेही वाचा...

राशीन परिसरात दमदार पाऊस 

राशीन : राशीनसह (ता. कर्जत) परिसरात आज (ता. 31) दुपारनंतर मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने एक तास हजेरी लावली. पावसामुळे परिसरात गारवा पसरला होता. 

राशीन, भांबोरे, देशमुखवाडी व परिसरातील वाड्या-वस्त्यांवर रोहिणी मनसोक्त बरसल्या. ऊस व फळबागांना यामुळे संजीवनी मिळाली. शेतकऱ्यांनी काढलेला कांदा काही ठिकाणी भिजला. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. 
नांगरणीनंतर तापलेल्या काळ्या ढेकळांवर पडलेल्या पावसाच्या धारांनी वातावरणात मोहक गंध पसरला होता. सकाळपासून उकाड्याने हैराण केले होते; मात्र दुपारनंतर पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. 
 

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com