अँटिजेनचा धाक; गर्दीला ब्रेक, सोनई प्राथमिक आरोग्य केंद्रातील जादू

लस घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी दोनशेहून अधिक ग्रामस्थ रांगेत उभे होते. अँटिजेन तपासणी करूनच लस देण्याचा निर्णय घेण्यात आला.
Antijan test.jpg
Antijan test.jpg

सोनई : कोरोना प्रतिबंधक (Corona) लस घेण्यासाठी मोठी रांग लागली खरी; मात्र प्रत्येकास रॅपिड अँटिजेन तपासणी सक्तीची केल्याने, काही क्षणात गर्दीतील ग्रामस्थ मागच्या मागे गायब झाले. सोनईतील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी (ता. 14) ही जादू झाली. मात्र, यामुळे अनेक डोस शिल्लक राहिले. (Fear of antigen; Crowd break, magic at Sonai Primary Health Center)

लस घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी दोनशेहून अधिक ग्रामस्थ रांगेत उभे होते. अँटिजेन तपासणी करूनच लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. रांगेतील पहिल्या बारापैकी सहा जण पॉझिटिव्ह निघाले आणि लगोलग अनेकांनी काढता पाय घेत घरचा रस्ता धरला. काल 140 डोस आले होते; मात्र अँटिजेन तपासणीच्या नियमामुळे प्रथमच अनेक डोस शिल्लक राहिल्याचा प्रसंग घडला. 

कोरोना नियंत्रण समितीचे अध्यक्ष सरपंच धनंजय वाघ यांनी केंद्राला भेट देऊन गर्दी टाळण्याची सूचना केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कसबे यांनी कोरोना स्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी अँटिजेन तपासणी आवश्‍यक असल्याचे सांगितले. ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारीनंतर गुरुवारपासून लसीकरणात विशेष काळजी घेऊन काम केले जात आहे. एका कर्मचाऱ्याने गुरुवारी मर्जीतील काही व्यक्तींना बाहेर जाऊन लस दिल्याची तक्रार होती. मात्र, कोरोना नियंत्रण समितीने, दोन दिवसांत आलेल्या एकूण डोस व देण्यात आलेल्या लसीची खातरजमा केली. मात्र, तथ्य आढळले नाही. याबाबत ग्रामस्थ अनिल निमसे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चौकशीत काय झाले, ते मात्र समजू शकले नाही. 

हेही वाचा...

संगमनेरला 21 गावांची रुग्णसंख्या दहाच्या आत 

संगमनेर : मागील वर्षीपासून तालुक्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला होता. तेव्हापासून आजपर्यंतच्या कालावधीत तालुक्‍यातील 174 गावे व वाड्या-वस्त्यांपर्यंत कोरोना प्रादुर्भावाचे लोण पोचल्याने पूर्ण तालुका कोरोनाच्या कचाट्यात सापडला. मात्र, आजची स्थिती पाहता, त्यांतील 21 गावांची रुग्णसंख्या 10च्या आत असल्याने, जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक धक्का बसलेल्या संगमनेरसाठी ही बाब दिलासादायक ठरली आहे. 

हेही वाचा...

कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहरातील बाधितांची संख्या वेगाने वाढत होती. दुसऱ्या लाटेतही ही संख्या लक्षणीय असतानाच, तालुक्‍याच्या ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने रुग्ण पुढे आले. त्यामुळे शहरासह तालुक्‍यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. राज्यातील वाढता प्रादुर्भाव थांबविण्यासाठी सरकारने "ब्रेक द चेन'अंतर्गत आधी 15 मेपर्यंत व आता थेट एक जूनपर्यंत कडक निर्बंध लागू केले असले, तरी शहरासह ग्रामीण भागातील रुग्णसंख्या अद्याप फारशी कमी झाली नाही. 

शहरात भाजीपाला विक्रीसह विविध प्रकारच्या खरेदीसाठी रोज मोठ्या प्रमाणात ग्रामीण नागरिकांची गर्दी होत असते. कठोर कारवाईच्या अभावामुळे सकाळी सात ते अकरा या निर्धारित वेळेनंतरही जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने व भाजीपालाविक्री सुरू राहिल्याने, ती बंद करण्याचे आवाहन प्रशासनाला करावे लागते. 

ग्रामीण भागातील रुग्णवाढ थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला असून, तालुक्‍यातील शिरसगाव, शिंदेडी, शेळकेवाडी, सावरचोळ, पेमरेवाडी, मीरपूर, मेंगाळवाडी, महालवाडी, कुंभारवाडी, खरशिंदे, खांडगेदरा, कौठेवाडी, कणसेवाडी, जुनेगाव, हसनाबाद, गोडसेवाडी, गाभणवाडी, धुपे, बांबळेवाडी, अझमपूर, आरामपूर या तुलनेने कमी लोकसंख्येच्या गावांतील रुग्णसंख्या दहाच्या आत आल्याचे दिसते आहे. 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com