काॅंग्रेसच्या विचारधारेमुळे देशाची लोकशाही टिकून ः थोरात
balasaheb thorat 1.jpg

काॅंग्रेसच्या विचारधारेमुळे देशाची लोकशाही टिकून ः थोरात

काँग्रेस पक्षाला मोठी परंपरा आहे. या पक्षाने कायम गोरगरीब व आदिवासींच्या विकासासाठी काम केले आहे.

अकोले : काँग्रेस पक्ष हा गोरगरीब व सर्वसामान्यांच्या विकासासाठी कायम कटिबद्ध आहे. या पक्षाच्या विचार धारेमुळे देशाची लोकशाही टिकून आहे म्हणून अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिवासी, इतर मागासवर्गीय व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात काल प्रवेश केला. (Democracy of the country survives due to the ideology of the Congress: Thorat)

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहावर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. या वेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, अकोले तालुकाध्यक्ष दादा पाटील वाकचौरे, काँग्रेसचे सेवादल जिल्हाध्यक्ष सुरेशराव झावरे, काँग्रेस नेते मीनानाथ पांडे, समन्वयक ज्ञानदेव वाफारे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी अकोले तालुक्यातील मीनाक्षी शेंगाळ, मारुती शेंगाळ, (पाडळणे) संतोष गायकवाड, रोहिदास पवार, पोपट कोटकर, बाळासाहेब कोटकर, मीराबाई भोईर, रोहिणी पवार, संगीता पवार, मंदा बर्डे यांसह आदिवासी इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती जमाती व महिला आघाडीच्या पदाधिकारी महिला व कार्यकर्त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

या वेळी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्षाला मोठी परंपरा आहे. या पक्षाने कायम गोरगरीब व आदिवासींच्या विकासासाठी काम केले आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी सातत्याने जनमाणसांच्या विकासाचे धोरण घेतले आहे. या उलट भाजपा सरकार भांडवलदारांसाठी काम करत आहे. म्हणून सर्वसामान्य जनता महागाई, बेरोजगारी व भूलथापांना कंटाळली असून, काँग्रेस पक्षामध्ये प्रवेशाचा ओढा वाढला आहे.तरुणांना या पक्षामध्ये मोठी संधी असल्याचेही ते म्हणाले.

आमदार डॉ तांबे म्हणाले की, देशात भाजपा सरकारने जनतेला फसवले आहे. पेट्रोल डिझेलची भरमसाठ दर वाढ होत आहे. गोरगरिबांसाठी काही होत नसून मोठ्या घोषणा या भांडवलदारांचा साठी होत आहेत. नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला पुढे पुन्हा वैभवाचे दिवस मिळणार असल्याचे ते म्हणाले. तर मीनानाथ पांडे म्हणाले की, अकोले तालुका हा पुरोगामी विचारांचा तालुका राहिला आहे .काँग्रेस पक्षामध्ये आगामी काळात अनेक कार्यकर्ते सामील होणार आहेत.

महिला आघाडीच्या मीनाक्षी शेंगाळ म्हणाल्या की, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होतो तेथेही प्रामाणिकपणे काम केले .परंतु तेथे सन्मानाची वागणूक मिळत नव्हती, तसेच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लागत नव्हते. लोकप्रतिनिधिंच्या कार्यशैलीला कंटाळून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा गोरगरिबांचा पक्ष आहे. बाळासाहेब थोरात हे सर्वमान्य नेतृत्व आहे .त्यांनी कधीही अकोले संगमनेर भेद केला नाही. अकोल्यातील जनता नामदार बाळासाहेब थोरातांवर प्रेम करत आहे. यापुढील काळातही अनेक महिला व कार्यकर्ते काँग्रेस पक्षात सामील होणार आहेत.

हेही वाचा..

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in