जन्मदात्या मातेनेच चिमुरड्याचे डोके ठेचून खून केल्याचे उघड, नेवासे तालुक्यातील घटना

प्रारंभी सोहम'चा मृतदेह पाहून नाटकी टाहो फोडणाऱ्या सीमाने पोलिस तपास दरम्यान पोलिसांची चांगलीच दिशाभूल केली. तिने अनेकांवर संशय घेतले.
Crime.jpg
Crime.jpg

नेवासे : वरखेड (ता. नेवासे) येथील सोहम खिलारे या आठ वर्षीय मुलाची दगडाने डोके ठेचून हत्या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. आईनेच मुलाचा खून केला आहे. (Chimurda's head was crushed to death by his birth mother, incident in Nevasa taluka)

रामडोह (ता. नेवासे) रस्त्याच्या पाटचारी रस्त्याचे कडेला मंगळवार (ता. ६) रोजी सकाळी दगडाने डोके ठेचून छिन्नविच्छिन्न केलेल्या अवस्थेत सोहमचा मृतदेह नागरिकांना आढळून आला होता. याप्रकरणी नेवासे पोलिसांत अज्ञात व्यक्तिविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. घटना उघड झाल्यापासून पोलिसासह ग्रामस्थांना या निर्घृण हत्येबाबत त्याच्या सावत्र बापावर संशय होता. मात्र पोलिस निरीक्षक विजय करे व त्यांच्या पथकाला चोवीस तासात मुख्य खूनाचा तपास लावण्यात यश आले.
सोहमची हत्या त्याची आई सीमा उत्तम खिलारे (वय ३२ रा. वरखेड, ता. नेवासे) हिनेच केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान नेवासे पोलिसांनी सीमाला खुनाच्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता तिला चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

कुभांडाने ती जाळ्यात अडकली

प्रारंभी सोहम'चा मृतदेह पाहून नाटकी टाहो फोडणाऱ्या सीमाने पोलिस तपास दरम्यान पोलिसांची चांगलीच दिशाभूल केली. तिने अनेकांवर संशय घेतले. पोलिसांनी संबंधित संशयितांना ताब्यात घेतले. मात्र त्यातून काही निष्पन्न झाले नाही. दरम्यान तपासात मिनिटा-मिनिटांना दिशाभूल करणारी माहिती ती पोलिसांना देत असल्याने पोलिसांचा तिच्यावरचा संशय बळावला आणि तिने रचलेल्या कुभांडामुळे ती पोलिसांच्या जाळ्यात अलगत अडकली.

"सोहम खिलारे हत्याप्रकरणी त्याची आई सिमा हिला अटक केली आहे. यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असून त्या दिशेने तपास चालू आहे.
- विजय करे, पोलिस निरीक्षक, नेवासे
 

हेही वाचा..

साइडपट्ट्यांचे काम न केल्यास उपोषण

राहुरी : टाकळीमियाँ येथे करपे गल्लीतील सिमेंटच्या नवीन रस्त्याच्या दुतर्फा साइडपट्ट्या भरलेल्या नाहीत. त्यामुळे एका तरुणाचा डंपरखाली चिरडून मृत्यू झाला. रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला आहे.

भविष्यात या रस्त्यावर पुन्हा अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठेकेदाराने येत्या सात दिवसांत रस्त्याच्या साइडपट्ट्या भराव्यात, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

टाकळीमियाँ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जालिंदर बेल्हेकर यांना ग्रामस्थांतर्फे निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, की ग्रामपंचायतीतर्फे करपे गल्लीतील सिमेंटच्या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. मात्र, साइडपट्ट्या भरलेल्या नसल्याने, ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अपघातात परितोष कुलकर्णी या तरुणाचा तीन दिवसांपूर्वी बळी गेला. कामाच्या दोषदायित्व कालावधीप्रमाणे झालेल्या कामाची चौकशी करण्यात यावी. मोजमाप पुस्तिकेप्रमाणे काम नियमाने झाले की नाही याची चौकशी करावी, येत्या सात दिवसांत साइडपट्ट्या भरण्याचे काम पूर्ण करावे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले जाईल. निवेदनावर योगेश करपे, गणेश करपे, अमोल शिवले, पप्पू करपे, आसिफ पटेल आदींच्या सह्या आहेत.

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com