दूधउत्पादकांना राज्य सरकारने दिलासा द्यावा : विखे पाटील

दिलेला शब्द न पाळल्याने संतप्त झालेले उत्पादक आता रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत, हे लक्षात घ्यावे.
radhakrushna vikhe.jpg
radhakrushna vikhe.jpg

राहाता : राज्य सरकारने दूधउत्पादकांना कबूल केल्याप्रमाणे प्रतिलिटर पाच रुपये थकीत अनुदान त्यांच्या बँक (Bank) खात्यांवर तातडीने जमा करून, सध्याच्या अडचणीच्या काळात दिलासा द्यावा. दिलेला शब्द न पाळल्याने संतप्त झालेले उत्पादक आता रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत, हे लक्षात घ्यावे, अशी मागणी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. (State government should give relief to milk producers: Vikhe Patil)

पत्रात म्हटले आहे, की राज्यात यापूर्वी दूधउत्पादकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले. त्या वेळी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने केली. मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात चौकशी करण्याची मागणी आपण केली. या गंभीर विषयाची दखल घेण्यात न आल्याने आता राज्यात दूधउत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. यापूर्वी लॉकडाउनमुळे खासगी आणि सहकारी दूध संघांनी दर प्रतिलिटर दहा ते पंधरा रुपयांनी कमी केले. त्यानंतर उत्पादकांनी आंदोलन केले. त्या वेळी सरकारने, शेतकऱ्यांच्या खात्यांत प्रतिलिटर पाच रुपये अनुदान वर्ग करावे,

खासगी व सहकारी दूध संघाना लागू होईल असा लुटमारविरोधी कायदा करावा, ‘एक राज्य एक ब्रँड’ धोरण स्वीकारावे, भेसळ प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करून ग्राहकांना शुद्ध आणि रास्त भावात दूध उपलब्ध होण्याची कायदेशीर हमी द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. त्याबाबतही कार्यवाही झाली नाही.

हेही वाचा..

६४२ आदिवासी कुटुंबांना खावटी अनुदान

राहाता : तालुक्यात सुमारे दोन हजार ६४२ आदिवासी कुटुंबांना खावटी अनुदान योजनेअंतर्गत रोख प्रत्येकी दोन हजार रुपये व दोन हजार रुपये किमतीच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. आपण घरोघरी जाऊन पात्र कुटुंबांकडून कागदोपत्री पूर्तता करून घेत आहोत, अशी माहिती आदिवासी नेते सुखदेव गायकवाड यांनी दिली.

गायकवाड म्हणाले, ‘‘या योजनेमुळे लॉकडाउनच्या काळात आदिवासी कुटुंबांना फार मोठा आधार मिळाला. तहसीलदार कुंदन हिरे यांचे सहकार्य मिळाले. राहाता शहरातील सुमारे १३५ कुटुंबांना आजवर या योजनेचा लाभ मिळाला. आणखी काही गरजू कुटुंबांपर्यंत या योजनेचा लाभ पोचविण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. यात नगराध्यक्ष ममता पिपाडा, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, विमल गायकवाड यांचेही सहकार्य मिळाले.’’

‘‘एकलव्य संघटनेचे रोहित मोरे, भागवत पवार, दिलीप माळी, साईनाथ गायकवाड, राजेंद्र पवार आदी गरजू लाभार्थींना योजनेचा लाभ देण्यासाठी परिश्रम घेत आहेत. तालुक्यातील एकही आदिवासी कुटुंब या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’’ असेही ते म्हणाले.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com