कुकडीचे पेटले पाणी ! आज सुनावणी, शेतीचे नाही, तर पिण्याचे तरी पाणी मिळेल का?

पिंपळगा जोगे धरणातील अचलसाठ्याबाबत सोमवारी(ता. 17) न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे. शेतीचे नाही तर पिण्याचे तरी पाणी मिळेल, अशी चर्चा सुरू आहे.
Kukadi Project.jpg
Kukadi Project.jpg

श्रीगोंदे : कुकडीच्या (Kukadi) पाण्याचा संघर्ष पाचवीलाच पुजलेला आहे. पाण्याची हमी देत कालवा सल्लागार समितीने शेतीचे आवर्तन ठरविले. मात्र त्याला "स्टे' मिळाल्याने शेतकरी चिंताक्रांत आहेत. (Chicken fire water! Today's hearing, not for agriculture, but for drinking water?)

पिंपळगा जोगे धरणातील अचलसाठ्याबाबत सोमवारी (ता. 17) न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे. शेतीचे नाही तर पिण्याचे तरी पाणी मिळेल, अशी चर्चा सुरू आहे.

आता न्यायालयीन लढाईत पिण्याचे पाणी तरी मिळेल, अशी अपेक्षा लाभधारक बाळगून आहेत. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तालुका कवेत घेतला आहे. वाढत्या रुग्णांसोबतच मृत्यूचे तांडवही सुरू असल्याने जनतेची चहूबाजूने कोंडी झाली आहे. 

चार साखर कारखाने, धरणांसह नद्यांचे पाटपाणी, यामुळे श्रीमंतीत गणल्या जाणाऱ्या तालुक्‍याला पुन्हा एकदा कुकडीचा पाणीप्रश्‍न भेडसावत आहे. घोड व विसापूर प्रकल्पांतून उन्हाळी हंगाम चांगला गेला. मात्र कुकडी प्रकल्पातील सर्वाधिक सिंचन असणाऱ्या श्रीगोंदेकरांच्या वाट्याला पाणीप्रश्‍नी कायमच आणीबाणी येते. गेल्या वेळी सत्ता भाजपकडे आणि आमदार राष्ट्रवादीचे. त्यातच खालच्या भागात पालकमंत्री असल्याने हक्क नावालाच राहिला. यंदा सत्ता महाविकास आघाडीची आणि आमदार भाजपचे अशी स्थिती आहे. 

पिंपळगा जोगे धरणातील अचलसाठ्याबाबत सोमवारी (ता. 17) न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे. शेतीचे नाही तर पिण्याचे तरी पाणी मिळेल, अशी चर्चा सुरू आहे. कुकडीतून शेतीला पाणी मिळाले नाही व पावसाळा लांबला, तर उभी पिके हातची जाण्याची भीती आहे. याप्रश्‍नी एकत्र येण्याची भाषा होते. प्रत्यक्षात जो-तो आपापला सवता सुभा राखण्यात मश्‍गूल असल्याने सावळा गोंधळ चव्हाट्यावर येतोय. 

कोरोनाचे वाढते संक्रमण

तालुक्‍यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा आता अकरा हजारांच्या घरात पोचला आहे. सध्या कोरोना ऍक्‍टिव्ह रुग्ण एक हजार असून, रोज दोनशेच्या पुढे कोरोनाबाधित आढळत येत असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांत याला ब्रेक बसला असल्याचे दिसत असले, तरी कोरोनाचा साखळी तुटणे आवश्‍यक आहे. तालुक्‍यात 26 कोविड सेंटर व विलगीकरण कक्ष आहेत. त्यातील एक हजार तीनशे बेड रुग्णांसाठी उपयोगी ठरत असल्याने प्रशासनावरचा ताण हलका झाला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणात वशिलेबाजी होत असल्याचा आरोप आहे. शहरातील ढिसाळ नियोजनाने उद्रेक होण्याची भीती आहे. तालुक्‍यात 35 हजार लोकांना लसीचा पहिला डोस दिल्याची माहिती आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या मात्र पाच हजारांच्या आतच आहे. त्यामुळ प्रशासनाला लसीकरण मोहिमेत सुधारणा करण्याची गरज आहे.

हेही वाचा...

दोन्ही प्रश्‍नी आता नेत्यांना हाताची घडी सोडावी लागणार

कुकडी व कोरोनाप्रश्‍नी नेत्यांना फ्रंटवर यावे लागणार आहे. तरुण पिढी सोशल मीडियावर दोन्ही प्रश्‍नी नेत्यांच्या नावाने शिमगा करू लागल्याने वेळीच सावध व्हावे लागेल. कुकडीच्या पाण्यासाठी प्रत्यक्षातील संघर्ष करावा लागेल. कोरोनात नेत्यांनी भलेही सेंटर उभारली असली, तरी सामान्यांच्या थेट संपर्कात मोजकेच आहेत. या दोन्ही प्रश्‍नी बांधलेली हाताची घडी सोडून नेत्यांना पुढे व्हावे लागेल. 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com