शिर्डीत साईभक्तांविना गुरुपौर्णिमा उत्सवास प्रारंभ; कळसाचे दर्शन घेऊन भाविक परतीला - Celebration of Gurupourni without Sai devotees in Shirdi; Devotees return after visiting Kalsa | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

शिर्डीत साईभक्तांविना गुरुपौर्णिमा उत्सवास प्रारंभ; कळसाचे दर्शन घेऊन भाविक परतीला

सतीश वैजापूरकर
गुरुवार, 22 जुलै 2021

बाबांना गुरुस्थानी ठेवून त्यांच्या हयातीत सुरू झालेल्या या उत्सवाने शंभरी पार केली. काळाच्या ओघात त्यात बदल होत गेले. बाबा कलावंतांचे चाहते होते. हजेरी लावणाऱ्या कलाकारांचा ते बिदागी देऊन गौरव करायचे.

शिर्डी : गायन, वादन व नृत्यासह लोककलांचे चाहते असलेल्या सद्‍गुरू साईनाथांच्या नगरीत आज (गुरुवारी) गुरुपौर्णिमा उत्सवास भाविकांविना प्रारंभ झाला. साई पालखी सोहळा समितीच्या पाच साईसेवकांनी कोविड नियमांचे पालन करीत, पुणे ते शिर्डी हे अंतर पायी पार केले. साईमंदिराच्या कळसाचे दर्शन घेत आपली ३३ वर्षांची परंपरा जपली. कळसाचे दर्शन घेऊन परतणारे भाविक, हे यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ट म्हणावे लागेल. (Celebration of Gurupourni without Sai devotees in Shirdi; Devotees return after visiting Kalsa)

उत्सवाच्या पहिल्या दिवशी साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी साईसमाधीची सपत्नीक पाद्यपूजा केली. द्वारकामाई मंदिरात साईसच्चरिताचे अखंड पठण सुरू झाले. विविध धार्मिक कार्यक्रमांत रवींद्र ठाकरे, बाबासाहेब घोरपडे, राजेंद्र जगताप, रमेश चौधरी आदी अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. सुनील बाराहाते यांनी साईमंदिरावर आकर्षक विद्युतरोषणाई केली.

बाबांना गुरुस्थानी ठेवून त्यांच्या हयातीत सुरू झालेल्या या उत्सवाने शंभरी पार केली. काळाच्या ओघात त्यात बदल होत गेले. बाबा कलावंतांचे चाहते होते. हजेरी लावणाऱ्या कलाकारांचा ते बिदागी देऊन गौरव करायचे. त्यांच्या दरबारात कलावंतिणींपासून ते दिग्गज शास्त्रीय संगीतकार हजेरी लावायचे. जयंत कुलकर्णी, पुष्पा पाकधरे, चंद्रशेखर गाडगीळ हे गायक अगदी अलीकडच्या काळात गुरुपौर्णिमा उत्सवात हमखास हजेरी लावायचे. पंडित जसराज, पंडित भीमसेन जोशी, दक्षिणेतील शास्त्रीय संगीतकार, पुण्यातले किराणा घराण्याचे नामवंत गायक सदाशिवराव जाधव यांना बाबांच्या दरबारात हजेरी लावण्यात धन्यता वाटायची. या उत्सवाच्या मुख्य दिवशी रात्रभर कलाकार हजेरी लावतात. साईसंस्थान त्यांना बाबांची बिदागी म्हणून एक रुपया व श्रीफळ देते. बाबांच्या पालखी आणि रथाच्या मिरवणुकीसमोर पुण्यातल्या नामवंत ब्रॉस बँडची हजेरी भाविकांचे लक्ष वेधून घेते. यंदाच्या उत्सवात हे नेहमीचे चित्र पाहायला मिळणार नाही.

कोळीनृत्याची परंपरा खंडित

मुंबईचे कोळी बांधव त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत वाद्यांच्या तालावर मनमुराद नाचत या उत्सवात सहभागी व्हायचे. एके काळी त्यांचे नृत्य हे या उत्सवाचे आकर्षण असायचे. काळाच्या ओघात त्यांची संख्या कमी होत चालली आहे. कोविड प्रकोपामुळे यंदाचा उत्सव भाविकांविना सुरू झाला आहे.

 

 

हेही वाचा..

कोपरगावात भाजपला धक्का

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख