कोपरगावमध्ये भाजपला धक्का ! या कार्यकर्त्याने स्विकारले आमदार काळे यांचे नेतृत्त्व

कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार आशुतोष काळे नियोजनबद्ध प्रयत्न करतात. त्यातून प्रलंबित अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत.
कोपरगावमध्ये भाजपला धक्का ! या कार्यकर्त्याने स्विकारले आमदार काळे यांचे नेतृत्त्व
Ashutosh Kale.jpg

कोपरगाव : भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका सरचिटणीस राजेंद्र खिलारी (Rajendra Khilari) यांच्यासह दिगंबर जाधव, आजिनाथ खटकाळे, बबनराव भवर, रमेश खटकाळे, रामभाऊ खटकाळे, विजय भवर, अरुण कर्डक आदी कार्यकर्त्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कोपरगाव शहरातील गौतम बँकेच्या सभागृहात हा प्रवेश झाला. (BJP pushed in Kopargaon! This activist accepted the leadership of MLA Kale)

कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार आशुतोष काळे नियोजनबद्ध प्रयत्न करतात. त्यातून प्रलंबित अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. त्यामुळे आपण त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. दीड वर्षात कोविडच्या साथीचा मुकाबला करीत असतानाही काळे यांनी मतदारसंघाच्या विकासाचा वेग कायम ठेवला आहे. त्यांना विकासाची दृष्टी आहे, अशी प्रतिक्रिया या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

काळे म्हणाले, ‘‘खिलारी हे भाजपचे जुने व अभ्यासू कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. गोदावरी कालव्यांच्या पाणीप्रश्नावर त्यांचा चांगला अभ्यास आहे. त्यांच्या या अनुभवाचा फायदा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी होईल. नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला जाईल. अन्य पक्षाचे अभ्यासू कार्यकर्ते आपल्यासमवेत काम करू इच्छितात, हे पाहून आनंद वाटतो.’’

हेही वाचा..

जिल्हा परिषदेत पहिल्याच दिवशी ४९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

नगर : जिल्हा परिषदेतील वर्ग-तीन व वर्ग-चार कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रक्रियेला आजपासून सुरवात झाली. पहिल्याच दिवशी तीन संवर्गांतील ४९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या.

राज्याच्या अर्थ विभागाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिल्यानंतर, ग्रामविकास विभागानेही जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. त्यानुसार आजपासून (मंगळवार) जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या ऑनलाइन बदल्यांना सुरवात झाली. बदलीपात्र कर्मचाऱ्यांना मुख्यालयात न बोलावता पंचायत समिती कार्यालयात उपस्थित राहण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार सामान्य प्रशासन, अर्थ व कृषी विभागातील कर्मचाऱ्यांची बदल्यांची प्रक्रिया पार पडली. यामध्ये नऊ प्रशासकीय, २७ विनंती व १३ आपसी, अशा एकूण ४९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

बदल्यांची प्रक्रिया सकाळी अकरा वाजता सुरवात झाली. यावेळी अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख, बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके आदी उपस्थित होते.

हेही वाचा..

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in