खंडणीसाठी आले आणि जिवानीशी गेले

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातल्या पैडी जंगलात नक्षलविरोधी पथकाने आज सकाळी एका चकमकीत तेरा नक्षल्यांना टिपले.
Nakshalwadi.jpg
Nakshalwadi.jpg

पुणे : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातल्या पैडी जंगलात नक्षलविरोधी पथकाने आज सकाळी एका चकमकीत तेरा नक्षल्यांना टिपले. या चकमकीत ठार झालेल्या सात महिला आणि सहा पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. (Came for ransom and died)

जिल्हा सामान्य रुग्णालयात ते पोस्टमोर्टमसाठी पाठविले जातील. सध्या तेंदुपाने (विडीपत्ता) तोडणीचा हंगाम सुरू आहे. तेंदू कंत्राटदाराकडून मोठी खंडणी वसूल करण्यासाठी पैडी जंगलात नक्षल्यानी तळ उभा केला, अशी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार अभियान नियोजित करण्यात आले.

पोलीस आणि नक्षली समोरासमोर आले असताना पोलिसांनी समर्पण करण्याचे आवाहन केले. मात्र नक्षल्यांनी गोळीबार सुरू केला. त्यामुळे प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केला.

सुमारे तासभर चाललेल्या धुमश्चक्रीनंतर नक्षलवादी जंगलात पळून गेले. यात ठार झालेल्या सहकाऱ्यांचे मृतदेह नेण्याची संधी न मिळाल्याने ते घटनास्थळीच पडून राहिले. या चकमकस्थळावरून पोलिसांनी 13 मृतदेहांसह मोठ्या प्रमाणावर स्फोटके-शस्त्रसाठा जप्त केलाय. या धडक कामगिरीनानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली पोलीस दलाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. समन्वयाने काम केल्याने आपण नक्षलवाद्यांचा मुकाबला करू शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा...

आजार बरा होण्याऐवजी वाढतोय 

श्रीरामपूर : शिरसगाव येथील डॉ. आंबेडकर वसतिगृहासह आदिवासी मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहांत प्रशासनाने उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

कोरोनामुळे सर्वांना स्वच्छतेचे महत्त्व कळाले असताना गोरगरीब रुग्ण उपचार घेत असलेल्या सरकारी कोविड सेंटरमध्ये मात्र नियमित स्वच्छता होत नसल्याचा आरोप शिरसगावचे उपसरपंच राजेंद्र गवारे यांनी केला आहे. 

स्थानिक प्रशासनाने शिरसगाव येथे डॉ. आंबेडकर वसतिगृहासह आदिवासी मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहांत गेल्या वर्षभरापासून कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढल्याने, लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला सूचना देऊन बेडची संख्या वाढविली. गंभीर रुग्णांसाठी ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड रुग्णालयात 50 बेड, डॉ. आंबेडकर वसतिगृहात 200 बेड व आदिवासी मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहांत प्रत्येकी 100 बेडची व्यवस्था केली आहे. या केंद्रांत कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार केले जातात. 

कचरा साचल्याने बेसिनसमोर कचराकुंडीचे स्वरूप आले आहे. शौचालयात स्वच्छतेअभावी मोठी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कोविड केअर केंद्रात दाखल झालेले गोरगरीब रुग्ण जीव मुठीत धरून उपचार घेत आहेत. 

येथील डस्टबिनमध्ये साचलेला कचरा रोज नेला जात नसल्याने, रुग्णांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनदेखील प्रशासनासह लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गवारे यांनी केला आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने रुग्णांना नातेवाइकांमार्फत पिण्यासाठी पाणी बाहेरून मागवावे लागते. 

हेही वाचा...

Edited by- Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com