पिचड यांच्या मागे बावनकुळेंची ताकद, अकोल्यात भाजपची जोरदार बांधणी

युवकांच्या माध्यमातून भाजप युवा मोर्चाची जोरदार बांधणी करून भाजपचे कार्य, विचारधारा, विकास कामे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे.
पिचड यांच्या मागे बावनकुळेंची ताकद, अकोल्यात भाजपची जोरदार बांधणी
Bavankule and pichad.jpg

अकोले : अकोले तालुक्याचे माजी आमदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोले तालुक्यात अनेक गावांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या शाखांचे उदघाटन होत आहे. त्याला गावागावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  

युवकांच्या माध्यमातून भाजप युवा मोर्चाची जोरदार बांधणी करून भाजपचे कार्य, विचारधारा, विकास कामे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे. युवकांना भाजपमध्ये जास्तीतजास्त काम करण्याची संधी मिळावी, या दृष्टिकोनातून आज भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते व माजीमंत्री मधुकरराव पिचड यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा वारीयर्स  शाखा उदघाटन सोहळा होत आहे.

माजी मंत्री बावनकुळे यांच्या माध्यमातून येणाऱ्या नगरपालिका व ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाची मोठी ताकद वाढविण्यासाठी तसेच ओबीसी समाज पक्षाकडे वळविण्याचा मोठा प्रयत्न होताना दिसत आहे.

बावनकुळे येणार म्हणून जिल्ह्यातील विविध समाजाच्या संघटना एका व्यासपीठावर येणार आहेत. अकोले येथे तेली समाजाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार नियोजन झाले आहे. माजी आमदार वैभव पिचड यांच्या मागे ओबीसी समाज संघटितपणे उभा करण्यासाठी भाजप नेते बावनकुळे प्रयत्न करणार आहेत. यावे ळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, भाजयुमो  विक्रमदादा पाटील यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे.

हेही वाचा..

अकोल्यातील पाच जलाशये भरली

अकोले : मुळा, भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे आंबीत, पिंपळगाव खांड, देवहंडी, कोथळा व वाकी जलाशये शंभर टक्के भरली आहेत. पाऊस सुरू झाल्याने शेतकरी गाळतुडवणी, आवणीची कामे करताना दिसत आहेत. बारी, वारंघुशी परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने वाकी जलाशय शंभर टक्के भरला. आतापर्यंत तालुक्यातील सहा धरणे भरली आहेत.

तालुक्यात जोरदार पाऊस होत असल्याने २०२ दशलक्ष घनफुटांचा बलठण जलाशय भरला. कोदणी वीज केंद्रातून वीजनिर्मिती सुरू झाली, तर रंधा धबधबा अवतीर्ण झाला आहे. मुळा पाणलोट क्षेत्रातील प्रत्येक गावात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने मुळा नदीला पूर आला आहे. भंडारदरा जलाशयात पाण्याची आवक वाढत आहे. वादळी पाऊस झाल्याने उडदावणे येथील बुवाजी गांगड, सखाराम गांगड यांच्या घरांवरील कौले उडाली. विजेचे खांब उन्मळून पडल्याने दहा गावे काही काळ अंधारात होती.

पावसामुळे भंडारदरा जलाशयात ४५९ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाल्याने जलाशयात ६६२७ दशलक्ष घनफूट म्हणजे ६०.२ टक्के पाणीसाठा झाला. तसेच वीजनिर्मितीसाठी ८४० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. निळवंडे जलाशयात १४३ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली, तर जलाशयात १९१३ दशलक्ष घनफूट पाण्याचा म्हणजे २२.९७ टक्के साठा उपलब्ध आहे. आढळात ४८७ दशलक्ष घनफूट म्हणजे ४५.१९ टक्के साठा झाला आहे. मुळा जलाशयात वेगाने पाण्याची आवक होत असून, कोतूळ येथील पुलावरून १६७५० क्यूसेकने मुळाचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे प्रवरा, मुळा, आढळा नद्या वाहू लागल्या आहेत.

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in