मोबाईलच नाही, अभ्यास कसा करायचा, असे विद्यार्थ्याने छेडताच तनपुरेंनी केले हे काम

दोन तासात त्या मुलाला तिसगाव येथील जनसंपर्क कार्यालय येथे बोलावून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीतसमर्थ तनपुरे यास मोबाईल दिला.
prajakt tanpure.jpg
prajakt tanpure.jpg

तिसगाव : तरूणांचे आयडॉल असलेले मंत्री प्राजक्त तनपुरे कधी क्रिकेट खेळताना, तर कधी वाढदिवस साजरा करताना नेहमीच चर्चेत असतात. आज मात्र ते वेगळ्याच कारणाने चर्चेत आले व सर्वच उपस्थितांचे मन जिकुन गेले. (Not only mobile, Tanpur did this work after the student teased him about how to study)

तनपुरे गुरुवारी तिसगाव दौऱ्यावर रस्त्याचे भुमीपूजन व आदिवासींना खावटीचे वाटप करण्यासाठी आले होते. त्यावेळी पारेवाडी येथील सरपंच तनपुरे यांच्या घरी अचानक भेट दिली व पारेवाडी ग्रामपंचायत पदाधिकारी व जनतेशी संवाद साधला. समर्थ तनपुरे या इयत्ता चौथीतील मुलगा समोर आला. आपल्याला अभ्यासासाठी मोबाईल नाही. त्यामुळे अभ्यास होत नाही, असे त्याने धाडसाने मंत्री महोदयांना सांगितले. या मुलाचे धाडस व हुशारी पाहुन तनपुरे यांनी या मुलाची कौंटुबिक माहिती जाणुन घेतली. त्यावेळी त्याचे पितृछत्र हरपलेले असून, तो परिस्थीतीने अत्यंत गरीब असल्याचे समजले.

या मुलास ऑनलाइन शिक्षणास मोबाइल नसल्याने अडचण येत आहे व शिक्षणापासून तो वंचित राहत आहे. हा सगळा प्रकार लक्षात आल्यावर लगेच त्या मुलाला जवळ बोलावून तात्काळ मोबाईल देण्याचे कबूल केले. दोन तासात त्या मुलाला तिसगाव येथील जनसंपर्क कार्यालय येथे बोलावून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत समर्थ तनपुरे यास मोबाईल दिला. या वेळी त्यांच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाले.

या वेळी अमोल वाघ, संजय लवांडे, जालिंदर वामन, सुनिल लवांडे, अमोल वाबळे, अविनाश नरवडे, अखिल लवांडे, नितीन लवांडे, अनिल रांधवणे, नवनाथ तनपुरे, गोविंद तनपुरे, संदिप बर्डे, योगेश आठरे व तनपुरे यांचे स्विय सहाय्यक नारायण नजन व बनकर उपस्थित होते.

तनपुरेे यांच्या या सामाजीक जाणीवेने केलेल्या मदतीचे परिसरात मोठी चर्चा होवून कौतुक होत होते. मंत्री महोदयांच्या या कृतीने कार्यकर्त्यासह तरुणांना प्रोत्साहन मिळते, अशी भावना सुनिल लवांडे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com