म्युकरमायकोसिसचे नगरमध्ये 73 रुग्ण - 73 patients in the city of mucomycosis | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

म्युकरमायकोसिसचे नगरमध्ये 73 रुग्ण

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 मे 2021

राज्यात कोरोनातून बऱ्या झालेल्या काही मधुमेहींमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळून येत आहेत. नगर शहरात अशा 73 रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

नगर : म्युकरमायकोसिसचे 73 रुग्ण नगरमध्ये उपचार घेत आहेत. या विकाराने बोल्हेगाव फाटा (Bolhegaon Phata) परिसरातील एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली. (73 patients in the city of mucomycosis)

राज्यात कोरोनातून बऱ्या झालेल्या काही मधुमेहींमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळून येत आहेत. नगर शहरात अशा 73 रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या रुग्णालयांकडून महापालिकेला दैनंदिन अहवाल प्राप्त होत आहे. शहरात उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी बोल्हेगाव फाटा परिसरातील रुग्णाची प्रकृती चिंताजनक होती. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. म्युकरमायकोसिससंदर्भात महापालिका व जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. हा आजार व त्यावरील उपचारासंदर्भातील माहिती प्रशासनाने डॉक्‍टरांना दिली आहे. तसेच, रुग्णांचा दैनंदिन अहवाल प्रशासनाला प्राप्त करून देण्याच्या सूचना महापालिका आयुक्‍त व जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्‍टरांना दिल्या आहेत. 

म्युकोरमायकॉसिस शस्त्रक्रिया यशस्वी 

श्रीरामपूर : म्युकोरमायकॉसिसचे आतापर्यंत तालुक्‍यात नऊ रुग्ण आढळून आले. त्यातील एका रुग्णावर येथील साखर कामगार रुग्णालयात नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया झाली. नागरिकांनी घाबरून न जाता धीराने समोरे जाण्याचे, आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी केले. 

कोरोनासह आता तालुक्‍यात म्युकोरमायकॉसिस आजाराचे रुग्ण आढळत आहेत. येथील आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आजआखेर नऊ रुग्णांचे निदान झाले असून शहरासह नगर, औरंगाबाद व नाशिक येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहे. नऊपैकी एका रुग्णांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने येथील साखर कामगार रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. 

डॉ. प्रणवकुमार ठाकूर, डॉ. गणेश जोशी, डॉ. शरद सातपुते, डॉ. ऋतुजा जगधने यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती साखर कामगार रुग्णालयाचे डॉ. रवींद्र जगधने यांनी दिली. 

हेही वाचा...

पुढाऱ्यांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडवावे

 

 

 

Edited By- Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख