संकटात राजकीय पुढाऱ्यांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडवावे !

नगर जिल्ह्यातील लॉकडाऊन थोडं शिथिल केलं तर लोकांनी खरेदीसाठी इतकी गर्दी केली की आपल्या गावाशी जणूकाही कोरोनाशी संबंधच नव्हता.
Pudhari.jpg
Pudhari.jpg

नगर : ज्येष्ठ समाजसेविका मदर तेरेसा (Mother Teresa) म्हणायच्या, की प्रत्येकाने आपापल्या जीवनकार्याशी एकनिष्ठ राहून कार्य करावे, लेखकाने सौंदर्याचे, पत्रकाराने सत्याचे, राजकीय पुढाऱ्यांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडवावे. आज लोक संकटात असताना विशेषत: पुढाऱ्यांकडून हीच अपेक्षा आहे. लोकांना खुल्यापणाने मदत करण्याची ! त्यांना आधार देण्याची ! (Political leaders should show sincerity in crisis!)

नगर जिल्ह्यातील लॉकडाऊन थोडं शिथिल केलं तर लोकांनी खरेदीसाठी इतकी गर्दी केली की आपल्या गावाशी जणूकाही कोरोनाशी संबंधच नव्हता. लोकहो, आजही आपण किती धक्कादायक बातम्या ऐकतो आहोत. खासदार राजीव सातव यांचे कोरोनाने झालेले निधन सर्वांनाच चटका लावून गेले. अगदी उमदे नेतृत्व होते. कॉंग्रेसचा हा हिरा राष्ट्रीय पातळीवर चमकत होता. सकाळचे पुण्यातील हडपसरचे प्रतिनिधी संदीप जगदाळे यांचाही कोरोनाने बळी घेतला. 

नगर जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्बंध कठोर केल्याने काहीप्रमाणात रुग्णसंख्या घटत होती. हे आशादायक चित्र होते. लोकांची गैरसोय होवू नये म्हणून कुठे लॉकडाऊन शिथिल केले तर खरेदीसाठी इतकी गर्दी केली की काही विचारू नका. आजच्या (ता.16) सकाळमध्ये गर्दीचे चित्र पाहून चिंतेत भरच पडली. आम्ही नियम पाळणारच नाही. गर्दी करणार आणि सरकारचे काही ऐकणार नाही असं आपण ठरवलं आहे का ! 

कोरोनाने ज्येष्ठ नागरिकांचा बळी जात आहे असा समज कोणी करून घेतला असेल तो चुकीचा आहे. ही खुळी समजूत प्रथम डोक्‍यातून काढण्याची गरज आहे. दुसऱ्या लाटेत तीस ते पंचेचाळीसमधील मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. हे सगळे तज्ज्ञ डॉक्‍टर्स ओरडून सांगता आहेत तरीही आपण इतके बेफिकीर कसे वागू शकते. दोन दिवसापूर्वीच राहुरीच्या डॉ.निलिमा घाटगे यांनी सकाळमध्ये जो लेख लिहिला होता. त्यावरून परिस्थिती किती गंभीर आहे हे लक्षात येते. कोरोनानंतर म्युकरमायकोसिस झाल्यानंतर काय काय होते. तो मेंदूपर्यंत कसा पोखरत जातो.या आजारातून बरं होण्यासाठी कोणत्या दिव्यातून जावे लागते हे ऐकल्यानंतर काळजी अधिक वाढते. 

कोरोना झाला आणि सिमटम्स नसतील तर ठीक आहे. पण, जर रुग्ण गंभीर झाला तर पाण्यासारखा पैसा कसा खर्च होतो याचा अनुभव आपण घेतच आहोत. म्युकरमायकोसिसचा तर खर्च म्हणे पंधरा वीस लाखाच्या घरात जातो. जर पैसे असतील तर ठीक आहे. नसतील तर काय करायचे ? कोठून आणायचे पैसे! 

माझा जवळचा एक मित्र आहे. त्याच्या आईला हा आजार झाला. ती कोरोनाने बरीही झाली. तिला घरी आणले. घरात अगदी आनंदी वातावरण होते. दोन दिवसांनी आईला मित्राने चहा दिला. आई चहा घेतलास का ! असे त्याने विचारले तर आई म्हणाली, "" चहाचे दोन कप दिसतात. कोणता कप घेऊ ! मित्राला आश्‍चर्य वाटले. त्याला शंका आली. त्यांने डॉक्‍टर्सची संवाद साधला असता ते म्हणाले, की तातडीने काही टेस्ट करावी लागेल. भरती करावे लागेल, पुढे झालेही तसेच. त्या माऊलीला म्युकरमायकोसिस झाला होता. आईवर उपचार करण्यासाठी मित्रांला काय काय करावे लागत आहे. याचा अनुभव मी घेत आहे. 

कोरोनाच्या महामारीत राजकीय नेत्यानीही केवळ आश्‍वासनाची खैरात न करता संकटात हतबल झालेल्या रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रामाणिकपणे मदत करण्याची गरज आहे. जे काम राजकारणी मंडळी करू शकतात तितका प्रभाव दुसरा कोणाचा पडू शकत नाही. प्रत्येक आमदार आणि पुढाऱ्यांनी आपआपल्या मतदारसंघातील लोकांची काळजी घेण्याची गरज आहे. केवळ करातो, पाहतो म्हणण्याची ही वेळ नाही.आमदार निलेश लंकेंची लोकांविषयी जी तळमळ दिसून येते ती प्रत्येक आमदारांमध्ये दिसली पाहिजे. यानिमित्ताने हीच अपेक्षा आहे. 

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com