ट्रॅक्टर चोरणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या, शिरुरमधील कारवाई

शेतकऱ्यांच्याघरासमोर, अंगणात किंवा शेतात लावलेले ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्याटोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेशनच्या पोलिस पथकाने पर्दाफाश केला आहे.
Crime.jpg
Crime.jpg

शिरूर : शेतकऱ्यांच्या (Farmer) घरासमोर, अंगणात किंवा शेतात लावलेले ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेशनच्या पोलिस पथकाने पर्दाफाश केला आहे. शिरूर शहरातील चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीकडून दहा ट्रॅक्टरसह पीकअप जीप, बोलेरो, स्कॉर्पिओ व सहा मोटारसायकली असा सुमारे ७७ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (Tractor thieves caught in Shirur)

सतिश अशोक राक्षे (रा. बाबूराव नगर, शिरूर, मूळ रा. बेलवंडी फाटा, ता. श्रीगोंदा, जि. नगर), ज्ञानदेव विनायक नाचबोणे (रा. रम्यनगरी, शिरूर, मूळ रा. जयनगर, ता. औसा, जि. लातूर), प्रवीण कैलास कोरडे (रा. बाबूराव नगर, शिरूर, मूळ रा. बोरी, ता. जुन्नर, जि. पुणे) व सुनिल बिभिषण देवकाते (रा. इरले, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांना अटक करण्यात आली असून, त्यांनी शिरूर, जुन्नर, आळेफाटा, नारायणगाव, यवत व मंचर या पुणे जिल्ह्यातील; तसेच नगर जिल्ह्यातील पारनेर व सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल २८ चोऱ्यांची व तीन ठिकाणी बॅंका, पतसंस्था व एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची कबूली दिली असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेशनचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सांगितले.

या टोळीकडून दहा ट्रॅक्टर, दोन पीक अप जीप, एक बोलेरो, एक स्कॉर्पिओ, सहा मोटारसायकलींसह; सहा गायी जप्त करण्यात आल्या आहेत.

गेल्या काही दिवसांत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाबरोबरच; लगतच्या नगर जिल्ह्यातून ट्रॅक्टर चोरीचे अनेक प्रकार घडले होते. यात शेतीवर गुजराण असलेल्या शेतकरी समाजाचे मोठे नुकसान होत असल्याचे व ट्रॅक्टरअभावी शेती करता येत नसल्याने बळीराजासमोर मोठ्या अडचणी उभ्या राहिल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेशनला ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सक्त सूचना केल्या होत्या. त्यानुसार घनवट यांच्या मार्गदर्शनखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे, सहायक फौजदार दत्तात्रेय गिरमकर, उमाकांत कुंजीर, जनार्दन शेळके, सचिन गायकवाड, दत्तात्रेय तांबे, दिपक साबळे, राजू मोमीन, अजित भुजबळ, गुरू जाधव, मंगेश थिगळे, संदीप वारे, जितेंद्र मांडगे, अक्षय जावळे या पथकाने जिल्ह्यातील या ट्रॅक्टर चोरी वर लक्ष केंद्रीत केले. त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासकामी विविध ठिकाणी पथके रवाना केली होती. त्यातून, शिरूर शहरात राहणारे सतिश राक्षे, ज्ञानदेव नाचबोणे व प्रवीण कोरडे यांच्याकडे ट्रॅक्टर व विविध वाहने असल्याची माहिती पथकाला मिळाली.

हे तिघेही कुठलाही कामधंदा करीत नाही, एकत्रीत फिरतात तरीही त्यांच्याकडे एवढी वाहने कशी, याबाबत संशय आल्याने पोलिस पथकाने या तिघांनाही शिरूरमधून ताब्यात घेतले. तेव्हा त्यांनी सुनिल देवकाते याच्यासह मिळून २८ चोऱ्या केल्याचे कबूल केले. या टोळीकडून चोरीतील वाहने व इतर साहित्य असा सुमारे ७७ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 
 

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com