प्रस्तावच नाही, हे उत्तर हास्यास्पद : बाळासाहेब थोरात यांची टीका - No proposal, this answer is ridiculous: Balasaheb Thorat's criticism | Politics Marathi News - Sarkarnama

प्रस्तावच नाही, हे उत्तर हास्यास्पद : बाळासाहेब थोरात यांची टीका

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 24 मे 2021

राज्यपालांनी समोर येऊन या संदर्भातला खुलासा केला पाहिजे आणि जनतेच्या मनामध्ये असलेले संभ्रम दूर केला पाहिजे.

मुंबई : राज्यपाल नियुक्त आमदार नेमायची यादीबाबत माहिती अधिकारात मागितलेल्या यादी माहिती यादी मागितली होती. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विधान परिषदेच्या 12 सदस्यांची यासंदर्भात निर्णय झाला. रीतसर पद्धतीने प्रस्ताव दाखल केला आहे. पण फाईलच सापडत नाही, प्रस्ताव आमच्याकडे नाही, असे उत्तर जर राजभवनातून येणार असेल, तर ही आश्चर्याची बाब आहे आणि हास्यास्पद देखील आहे, अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली. (No proposal, this answer is ridiculous: Balasaheb Thorat's criticism)

थोरात म्हणाले, की हे उत्तर अत्यंत चुकीचे आहे. अधिकृतपणे हे उत्तर दिलं पाहिजे. आणि फाइल सापडत नाही, याबाबत कारवाई व्हायला पाहिजे. राज्यपालांनी समोर येऊन या संदर्भातला खुलासा केला पाहिजे आणि जनतेच्या मनामध्ये असलेले संभ्रम दूर केला पाहिजे. असे कसे होऊ शकते, जो प्रस्ताव आम्ही दिला, तो प्रस्ताव त्यांच्याकडे नाही. यात राजकारण काही नाही, पण हे वागणे चुकीचे आहे. राज भवन आणि राज्यपाल यांनी यासंदर्भातला खुलासा दिला पाहिजे.

चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना भरपाईबाबत लवकरच चर्चा

तोक्ते चक्रीवादळ हे दुसरं वादळ आहे, याच्या आधी निसर्ग चक्रीवादळामुळे देखील मोठं नुकसान झाले होते. मुख्यमंत्री आणि मी स्वतः दौरा केला आहे. मंत्रिमंडळातील सदस्यांनी देखील खूप काम केलेले आहे. विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, अस्लम शेख यांनी देखील चांगले काम केले. विविध पक्षातील मंत्र्यांनी वारंवार दाैरे करून काम केले आहे. सर्वांना ही वस्तुस्थिती माहिती आहे. त्यामुळे या कॅबिनेटमध्ये या नुकसान भरपाई संदर्भातला चर्चा होईल.

चक्रीवादळात आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी होत्या, नैसर्गिक आपत्तीमध्ये देखील शेतकऱ्यांना मोठी मदत केली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः परिस्थिती बघितली आहे. अनेक मंत्र्यांनी स्वतः या गोष्टी पाहिल्या आहेत. त्याच्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय घेऊ, असे थोरात यांनी सांगितले.

 

हेही वाचा...

मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने किराणा वाटप

नगर : कोरोना महामारी रोखण्यासाठी सरकारने लावलेल्या लॉकडाऊनमुळे काम-धंदे बंद आहेत. त्यामुळे हातावर पोट असणार्‍यांवर मोठे संकट ओढावले आहे. गेल्या वर्षीही अनेक दिवस बंद व आताही दोन महिन्यांपासून सर्वत्र बंद असल्याने या घटकांचे मोठे हाल होत असून, अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहेत.

शासनाच्यावतीने मोजक्याच घटकांना मदत करण्यात येत आहे, ती ही तुटपुंजी, परंतु यातून अनेक घटक दुर्लक्षित राहत आहेत, अशा घटकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. यासाठीच मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रिक्षाचालक व घरकाम करणार्‍या महिलांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी आपआपल्या परिने जवळपास असणार्‍या गरजूंना मदत करावी,  असे आवाहन मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केले.

हेही वाचा...

महिलांसाठी कोविड सेंटर

 

 

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख