नगर महापालिकेचे महिलांसाठी कोविड सेंटर ठरतेय पथदर्शी - Kovid Center for Women is a guide for the Municipal Corporation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

नगर महापालिकेचे महिलांसाठी कोविड सेंटर ठरतेय पथदर्शी

अमित आवारी
सोमवार, 24 मे 2021

कोरोनाची पहिली लाट नगर शहरात वाढू लागल्यानंतर महापालिकेला विविध ठिकाणी कोविड सेंटर सुरू करावे लागले होते.

नगर : नगर महापालिकेने कोरोनाच्या (Corona) पहिल्या लाटेपासूनच महिलांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरू केले आहे. महिलांना सर्वसाधारण कोविड सेंटरमध्ये येणाऱ्या अडचणी लक्षात घेता सुरू केलेले हे राज्यातील पहिले महिला मोफत कोविड सेंटर पथदर्शी ठरत आहे. (Kovid Center for Women is a guide for the Municipal Corporation)

कोरोनाची पहिली लाट नगर शहरात वाढू लागल्यानंतर महापालिकेला विविध ठिकाणी कोविड सेंटर सुरू करावे लागले होते. संपूर्ण कुटूंब बाधित झाल्यास असे कोविड सेंटर ठिक होते मात्र कुटूंबातील एक अथवा दोन महिलाच कोरोना बाधित आढळून आल्यास त्यांना अशा कोविड सेंटरमध्ये राहणे जरा अडचणीचे वाटू लागल्याच्या तक्रारी होत्या. कोविड सेंटरमध्ये महिलांना येणाऱ्या काही अडचणी लक्षात घेता महापालिकेने महिलांसाठीच स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करण्याची तयारी केली. जैन पितळे बोर्डींग चालक संस्थेने सहमती दर्शविल्याने महापालिका व गुरू अर्जुन देव घर घर लंगर सेवेतर्फे या जागेत 70 बेडचे महिलांसाठीचे कोविड सेंटर 19 सप्टेंबर 2020ला सुरू करण्यात आले. हे राज्यातील पहिले महिलांसाठीचे कोविड सेंटर होते. 

कोरोनाच्या पहिल्या लाटेत या कोविड सेंटरमधून 150 महिला रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत 320 महिला रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या कोविड सेंटरमधील कर्मचारीही प्रामुख्याने महिलाच आहेत. 

सकाळी योगासणे, सकाळी नाष्टा, दुपारी जेवण, दोन वेळ चहा, काढा अथवा हळद टाकलेले दूध, सायंकाळी जेवण अशी दिनचर्या या कोविड सेंटरमध्ये आहे. फक्‍त महिलाच कोविड सेंटरमध्ये असल्याने गप्पा रंगतात. त्यामुळे सकारात्मक वातावरण असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. घर घर लंगर सेवेकडून नाष्टा व जेवणांची सोय होत आहे. घर घर लंगर सेवेच्या सेवाभावामुळे रुग्णांना आपण कुटूंबातच आहोत असे वाटते. महिलांना खेळण्यासाठी कॅरम बोर्ड, लुडो, बुद्धिबळ, बॅडमिंटन, चित्रकला पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

मूलभूत सेवा सुविधा आय लव्ह नगर, शांतिकुमार फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशन, जैन ओसवाल पंचायत यांच्याकडून मिळाल्या आहेत. या कामी हरजितसिंग वधवा, प्रशांत मुनोत, प्रितपालसिंग धुप्पड, जनक अहुजा, किशोर मुनोत, राहुल बजाज, राजा नारंग, सनी वधवा, मनोज मदान, सुनील छाजड, करण धुप्पड, कैलास नवलानी, राहुल शर्मा, नारायण अरोरा, सतीश गंभीर आदी 65 लोक कार्यरत आहेत. 

पोस्ट कोविड रुग्णांवर उपचार 

कोविडमधून बऱ्या होणाऱ्या काही रुग्णांना उपचाराची गरज असते. अशा रुग्णांसाठी काय करता येई या संदर्भात हरजितसिंग वधवा यांनी महापालिका आयुक्‍त शंकर गोरे, उपायुक्‍त यशवंत डांगे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्याशी चर्चा करून पोस्ट कोविड रुग्णांनाही जैन पितळे बोर्डिंगमध्ये उपचाराची सोय करण्यात आली आहे. आतापर्यंत तीन पोस्ट कोविड रुग्ण बरे झाले आहेत. 

मार्निंग किट 

कोविड सेंटरमध्ये नवीन भरती होणाऱ्या रुग्णाला मोफत टूथ ब्रश, पेस्ट, कंगवा, तेल, कपडे धुण्याचा साबन, अंघोळीचा साबन अशी मार्निंग किट देण्यात येते. 

राज्यातील पहिला प्रयोग

महिलांना सर्वसाधारण कोविड सेंटरमध्ये येणाऱ्या अडचणी लक्षात घेता सुरू केलेले हे राज्यातील पहिले महिला कोविड सेंटर पथदर्शी ठरत आहे. राज्यातील विविध ठिकाणी महिलांसाठी आता कोविड सेंटर सुरू होत आहेत. मात्र याची सुरवात नगरमधून झाली आहे. 
- यशवंत डांगे, उपायुक्‍त, नगर महापालिका. 

 

हेही वाचा...

खतांच्या निर्णयाबाबत चांगला निर्णय

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख