`सकाळ`चे बातमीदार संदीप जगदाळे यांचे निधन

अत्यंत मनमिळावू स्वभावाचे संदीप हे गेल्या अनेक वर्षापासुन हडपसर भागात पत्रकारिता करीत होते. कोरोनाचा काळात देखील ते जबाबदारीने कर्तव्य बजावित होते.
Jagdale.jpg
Jagdale.jpg

पुणे : सकाळचे हडपसर भागातील बातमीदार संदीप जगदाळे (Sandeep Jagdale) यांचे गुरूवारी रात्री ७:४५ वाजता निधन झाले. ते ४५ वर्षांचे होते. मागील पंधरा वर्षांपासून सकाळमध्ये हडपसर भागातील बातमीदार म्हणून काम पाहत होते. कोरेगाव पार्क येथील पुणे अंध शाळेमध्ये ते एमएसडब्ल्यू (समाजसेवक) या पदावर कार्यरत होते. (Sakal's Reporter Sandeep Jagdale passed away)

अत्यंत मनमिळावू स्वभावाचे संदीप हे गेल्या अनेक वर्षापासुन हडपसर भागात पत्रकारिता करीत होते. कोरोनाचा काळात देखील ते जबाबदारीने कर्तव्य बजावित होते. बातमीदारीच्या माध्यमातून त्यांनी हडपसर भागातील अनेक विषय मांडत आवाज उठविला होता. विविध विषयावर सातत्याने पाठपुरावा करून त्या भागातील अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. त्या भागातील सामजिक, राजकीय विषयावर ते उत्कृष्टपणे बातमीदारी करत होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक संस्था आणि संघटनांनी त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविले होते. त्यांच्या जाण्याने विविध स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हडपसरमधील युवा पत्रकार संदीप ज्ञानदेव जगदाळे यांच्या पश्चात आई-वडिल, भाऊ, भावजय, पत्नी, मुलगा, दोन बहिणी असा परिवार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या साधना कन्या विद्यालयामधील शिक्षिका सारिका संदीप जगदाळे यांच्या त्या पत्नी होत. संदीप जगदाळे (मुर्टी, ता. बारामती) शेतकरी कुटुंबातील होते. ते शिक्षणासाठी काही वर्षांपूर्वी पुण्यात आले होते. त्यानंतर ते हडपसर येथे स्थायिक झाले. ग्रामीण भागातून येऊन त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली होती. सुमारे 20 दिवसांपुर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती तेव्हापासुन त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, आज (गुरूवार) त्यांचे निधन झाले आहे.

हेही वाचा...

केंद्र सरकार देशात चांगल्या उपाययोजना राबवत आहे : राम शिंदे

नगर : गेल्या वर्षीच्या तुलनेत आता करोनाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणत वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार दूरदृष्टीने संपूर्ण देशात चांगल्या उपाययोजना राबवत आहे.

हेही वाचा...

नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत आहेत. नगर जिल्ह्याला केंद्र सरकारकडून मिळालेल्या निधीतूनही अत्यावश्यक सुविधा सुरु झाल्या आहेत. या निधीतून जिल्हा रुग्णालयात उभारलेला ऑक्सिजन प्लँट आता योग्यवेळी कार्यान्वित झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना मुबलक प्राणवायू मिळत असल्याने अनेकांचे प्राण वाचत असल्याने समाधान वाटते. आता ग्रामीण भागात करोना बधीताना जास्तीतजास्त बेड, इंजक्शन व ऑक्सिजन तातडीने मिळावे, यासाठी जिल्हारुग्णालयाने अधिक उपाययोजना राबवाव्यात, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी केले.

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com