विनापरवानगी ओबीसी आंदोलन केल्याने पंकजा मुंडे, महेश लांडगेंविरुद्ध गुन्हा

ओबीसी आऱक्षणासाठी भाजपने शनिवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन केले. पुण्यातील या आंदोलनात सहभाग नोंदवून मुंडे या पिंपरीतील चक्काजाममध्ये सामील झाल्या.
bjp1.jpg
bjp1.jpg

पिंपरीः जमावबंदीत विनापरवानगी ओबीसी आरक्षणासाठी पिंपरीत (Pimpari) चक्काजाम आंदोलन केल्याने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde), भोसरीचे पक्षाचे आमदार महेश लांडगे यांच्यासह शहर पदाधिकारी व नगरसेवकांना पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले. नंतर त्यांना सोडून देण्यात आले. परवानगी न घेता जमावबंदी आदेश व कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्याविरुद्ध पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.या आंदोलनात कोरोना निर्बंधाचा व त्यातही सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उ़़डाल्याचे दिसून आले. (Crime against Pankaja Munde and Mahesh Landge for carrying out OBC agitation without permission)

ओबीसी आऱक्षणासाठी भाजपने शनिवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन केले. पुण्यातील या आंदोलनात सहभाग नोंदवून मुंडे या पिंपरीतील चक्काजाममध्ये सामील झाल्या. भाजपचे शहर कारभारी आमदार लांडगेसह त्यांचे पालिकेतील व पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.नव्या कोरोना डेल्टा विषाणूमुळे राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध कालच आणखी कडक केले आहेत.

सामाजिक,राजकीय कार्यक्रम टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, हे नियम पिंपरीतीलआंदोलनात आज पायदळी तुडवण्यात आल्याचे दिसून आले.सामाजिक अंतर न राखता ते  केले गेले.त्यात पन्नासपेक्षा कितीतरी अधिकजण सामील झाले होते. त्यातील काहींच्या तोंडावर,तर मास्कही नव्हता. स्वत मुंडे यांनीही तो घातला नसल्याचे दिसून आले.

शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात हा चक्काजाम असल्याने सकाळपासूनच तिकडे जाणारे रस्ते पोलिसांनी बंद करून वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली होती. ओबीसी के सन्मान मे, भाजप मैदानमे, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, या सरकारचे करायचे काय, खाली डोके, वर पाय, राज्य शासनाची खेळी,ओबीसी आऱक्षणाचा बळी आणि उठ ओबीसी जागा हो, एकजुटीचा धागा हो,अशा घोषणा आंदोलक देत होते. तसे फलकही काहींच्या हातात होते.

आंदोलनाची कॉमेंट्री ही नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले आनंदा यादव यांनी गावच्या जत्रेत होणाऱ्या बैलगाडा शर्यतीसारखी केल्याने गंभीर वातावरण काहीकाळ हलके झाले होते. या आंदोलनानंतर त्यात सहभागी झालेल्या मुंडे,लांडगे व इतर शंभर भाजप पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिस व्हॅनमध्ये बसविल्यानंतरही त्यांच्या घोषणा सुरुच होत्या. पिंपरी पोलिस ठाण्याावर नेल्यानंतर अर्धा तासाने त्यांना सोडण्यात आले. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिली नव्हती, असे पिंपरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक भोजराज मिसाळ यांनी `सरकारनामा`ला सांगितले. त्यामुळे विनापरवानगी तसेच जमावबंदीचा आदेश लागू असतानाही कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आंदोलन केल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
 

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com