ओबीसी समाजाच्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत : खासदार विखे पाटील

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर फेरविचार याचिका दाखल करू. असे एकाही मंत्र्याने म्हंटले नाही. हे दुर्दैवी आहे.
Bjp.jpg
Bjp.jpg

राहुरी : महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे (OBC) राजकीय आरक्षण रद्द झाले. आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी विरुद्ध खुल्या गटातील उमेदवार अशा लढती होऊन, जातीय व सामाजिक तेढ वाढणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या मंत्र्यांनी राजीनामे देऊन, समाजाच्या पाठीशी राहण्याची हिंमत दाखवावी. असे आवाहन खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी दिले. (OBC community ministers should resign: MP Vikhe Patil)

आज (शनिवारी) राहुरी येथे बसस्थानक चौकात महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपातर्फे चक्काजाम आंदोलन प्रसंगी खासदार डॉ. विखे-पाटील बोलत होते. माजी आमदार शिवाजी कर्डिले, कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रेय ढूस, तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, सुभाष गायकवाड, रवींद्र म्हसे, सुरसिंग पवार, शिवाजी सोनवणे, चाचा तनपुरे, श्यामराव निमसे, प्रकाश पारख उपस्थित होते.

खासदार डॉ. विखे म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर फेरविचार याचिका दाखल करू. असे एकाही मंत्र्याने म्हंटले नाही. हे दुर्दैवी आहे. शासनाने वीज तोडली. दुध दर कोसळले. राहुरी तालुक्यात मागील आठ वर्षात सर्वाधिक अवैध वाळू उपसा मागील दोन-तीन महिन्यात झाला. हप्ता, टक्केवारीमुळे राहुरीचे चित्र बदलले. राहुरी पालिकेतील भ्रष्टाचारावर बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जातो."

माजी आमदार कर्डिले म्हणाले, "जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका सदस्याच्या संधीतून ओबीसी समाज वंचित राहणार आहे. राज्य सरकार कोरोनाच्या संकटात अपयशी ठरले. कोरोना रुग्णांच्या मृत्यूस राज्य सरकार जबाबदार आहे. नगर येथे आज चक्काजाम आंदोलन झाल्यावर मला व खासदार डॉ. विखे-पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंम्ही जामीन देणार नाही. असे सांगितल्यावर आंम्हाला सोडले." असेही कर्डिले यांनी सांगितले.

हेही वाचा..

कर्जतमध्ये आंदोलन

कर्जत : ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण पुन्हा एकदा मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीने योग्य बाजू मांडावी व त्याच बरोबर मराठा आरक्षण ची ही न्यायालयात योग्य बाजू मांडून ते परत मिळवून द्यावे. या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज मुख्य रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर, प्रसिध्दी प्रमुख सचीन पोटरे, नगराध्यक्षा प्रतिभा भैलूमे, नगरसेविका उषा म्हेत्रे-राऊत व राणी गदादे, सरपंच काकासाहेब धांडे, दादासाहेब सोनमाळी, विनोद दळवी, अमृत काळदाते, अनिल गदादे उपस्थित होते.

तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले. या वेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव उपस्थित होते. महाविकास आघाडीचे सरकार सर्व सर्व क्षेत्रात अपयशी ठरले असून, ओबीसी राजकीय आणि मराठा आरक्षण न दिल्यास याही पेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, आशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा..

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com