केंद्रातील सरकार शेतकरीविरोधी आहे 

शेतकऱ्यांविरोधात केंद्र सरकार आहे. शेतकरी विरोधातील कायदांना राज्य सरकारचा विरोध आहे. केंद्र सरकारने कोणतीही चर्चा न करता कायदे मंजूर केले असून, ते शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकत नाहीत, हे देशाचे दुर्दैव आहे.
Balasaheb Thorat
Balasaheb Thorat

नाशिक रोड : शेतकऱ्यांविरोधात केंद्र सरकार आहे. (Centre government is Anti farmers) शेतकरी विरोधातील कायदांना राज्य सरकारचा विरोध आहे. (State Government is against Anti farmers law) केंद्र सरकारने कोणतीही चर्चा न करता  कायदे मंजूर केले असून, (Centre government approve these law without farmers consultation) ते शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकत नाहीत, हे देशाचे दुर्दैव आहे. शेतकरी संघटनांनी राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या हिताचा प्रस्ताव सादर करावा, त्यावर नक्की विचार केला जाईल, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले. 

केंद्र सरकारचे शेतकरीविरोधी तीन काळे कायदे व प्रीपेड वीजबिल विधेयकाविरोधात दिल्ली व देशभर लढणाऱ्यांच्या समर्थनार्थ  शेतकरी जनजागृती परिषद येथील बाजार समितीच्या आवारात झाली. यावेळी ते बोलत होते. 

ते म्हणाले, की शेतकऱ्यांसाठी सर्वपक्ष एकत्र आले, ही चांगली बाब आहे. मोदी सरकार आल्यापासून कायद्यात बदल वाढले. यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. शेतकरी कायद्यांवर सभागृहात चर्चा नाही. ज्यांनी सभागृहात बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांना निलंबित केले. नेहरू, आंबेडकर यांच्या विचारमंथनातून पुरोगामी विचारातून निर्माण झालेले कायदे मोदी सरकार एका दिवसात बदलवून भांडवलदार, उद्योगपतींच्या हातात देत आहे. 

रेल्वे, विमानतळ विकले. एलआयसी बुडवली. विकणारे दोघे, घेणारे दोघे असे सुरू आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र अजून एवढे समजले नाही. चिमटा बसल्याशिवाय आपण जागे होत नाही. पंजाब, हरियाना शेतकऱ्यांचे अभिनंदन केले पाहिजे.  

कायदे कडक असतानाही शेतकऱ्यांची फसवणूक झालीच. प्रताप दिघावकारांनी २५ कोटी रुपये परत मिळवून दिले. राज्य सरकार या कायद्यात बदल करणार असून, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना थेट तुरुंगात टाकण्याची तरतूद आहे. श्रमिकांचे केंद्र सरकार नाही. रस्त्यावर येऊन लढण्याची सवय आता राहिली नाही. तुमचे म्हणणे, ठराव पाठवा, त्यानुसार काम करू. तुमच्या पाठीशी राज्य सरकार आहे. 

खासदार गोडसे, आमदार दिलीप बनकर, सरोज आहिरे, देवीदास पिंगळे, विजय करंजकर, किसन धुर्जड यांची भाषणे झाली. रमेश औटे यांनी सूत्रसंचालन केले. निवृती अरिंगळे, सुदाम बोराडे, मधुकर सातपुते, गोरखनाथ बलकवडे, केशव बोराडे, दत्तात्रय बागूल, चंपालाल पवार, बबनराव कांगणे, बहुजन शेतकरी संघटना नाशिक जिल्हा, अखिल भारतीय किसान सभा, किसान सभा, किसान काँग्रेस संघटनेने संयोजन केले. 

यावेळी अशोक खालकर अध्यक्षस्थानी होते. माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, खासदार हेमंत गोडसे, देवीदास पिंगळे, राजू देसले, आमदार सरोज आहिरे, दिलीप बनकर, हिरामण खोसकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर,  राजेंद्र डोखळे,  शरद आहेर, राजाराम धनवटे, माजी महापौर नयना घोलप, प्रभाग सभापती प्रशांत दिवे, नगरसेवक राहुल दिवे, संतोष साळवे, संपत सकाळे, संदीप गुळवे, करण गायकर, शरद तुंगार, नगरसेवक जगदीश पवार, वसंत अरिंगळे, अरुण जाधव, सुनील कांबळे, बाळासाहेब म्हस्के, राहुल ताजनपुरे, किरण जाधव, बाळासाहेब मते, विक्रम कोठुळे, रतन जाधव, विजय खर्जुल, रामकृष्ण झाडे, नामदेव बोराडे, शांताराम भागवत, सुखदेव गायखे, शिवाजी म्हस्के, नारायण बोराडे आदी उपस्थित होते. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com