नाशिकचे कार्यकर्ते म्हणतात, काँग्रेस कार्यकारिणीत अकरा जण कसे?

महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. त्यात नाशिकच्या तब्बल अकरा जणांना स्थान मिळाले आहे. ही खरे तर आनंदांची बाब आहे. मात्र महापालिका, जिल्हा परिषद व एकंदरच पक्षाच्या सदस्यांची स्थिती पाहता, तब्बल 11 जणांची नियुक्ती इतर कोणाला नव्हे, पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठीच आश्चर्याची बाब ठरली आहे. यातील काहींना तर कार्यकर्त्यांनी पाहिलेले देखील नाही, असे ते म्हणतात.
Nana Patole
Nana Patole

नाशिक : महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. (MPCC committee declaire recently) त्यात नाशिकच्या तब्बल अकरा जणांना स्थान मिळाले आहे. (This inclueds Nashik`s 11 persons) ही खरे तर आनंदांची बाब आहे. (It is a good news) मात्र महापालिका, जिल्हा परिषद व एकंदरच पक्षाच्या सदस्यांची स्थिती पाहता, तब्बल 11 जणांची नियुक्ती इतर कोणाला नव्हे, पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठीच आश्चर्याची बाब ठरली आहे. (But this is shocking for many workers) यातील काहींना तर कार्यकर्त्यांनी पाहिलेले देखील नाही.   

प्रदेश कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. त्यात नाशिकचे माजी आमदार जयप्रकाश छाजेड, राजाराम पानगव्हाणे (उपाध्यक्ष), नगरसेविका डॅा हेमलता पाटील, माजी राज्यमंत्री डॅा सोभाताई बच्छाव (सरचिटणीस), माजी आमदार अनिल आहेर, नगरसेवक राहुल दिवे, भास्कर गुंजाळ, जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील (बिरारी), सुमित्रा बहिरम,  ज्ञानेश्वर गायकवाड  असे दहा सदस्य आहेत. याशिवाय यापूर्वीचे दहा उपाध्यक्ष कायम आहेत. त्यात नाशिकच्या शरद आहेर यांचा समावेष असल्याने ही संख्या तब्बल अकरा होते.

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, धुळे व नाशिक या जिल्ह्यांचा विचार केल्यास नंदुरबार जिल्ह्यात एकालाही स्थान मिळालेले नाही. धुळे येथून माजी खासदार डी. एस. अहिरे तर जळगावला डॅा उल्हास पाटील यांचा समावेष आहे. थोडक्यात या जिल्ह्यांतून प्रत्येकी एक सदस्य आहेत. पदसिद्ध म्हणून कुणाल पाटील (धुळे), आमदार हिरामण खोसकर (नाशिक) आणि के. सी. पा़डवी यांचा समावेष आहे. अशा स्थितीत शहरात अवघे सहा नगरसेवक व जिल्ह्यात नऊ जिल्हा परिषद सदस्य असताना नाशिकला थेट अकरा सदस्यांची लॅाटरी लागली तरी कशी?. त्यामागे काय राजकीय सूत्र, कसले नियोजन आणि आाडाखे असतील?. याबाबत अन्य कोणी नव्हे तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही प्रश्न पडला आहे. अक्षरशः गेले दोन दिवस ही मंडळी त्याबाबत एकमेकांकडे विचारणा करीत आहेत. 

प्रदेश कार्यकारीणीत नियुक्ती होताना संबंधीत नेते, कार्यकर्ते यांची उपयुक्तता व पक्षासाठी योगदान विचारात घेतले जाते. त्याचबरोबर पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी गरज असलेल्यांची देखील थेट नियुक्ती होते. मात्र यंदाच्या कार्यकारिणीत आक्रमक स्वभावाचे व थेट भाजपला बिडणारे नाना पटोले प्रदेश अध्यक्ष असल्याने पक्षाची व कामकाजाची सध्या चांगली चर्चा होत आहे. श्री. पटोले यांनी यात जुन्या नव्यांचा मेळ बसविलेला दिसतो. परंतु हे करताना नियुक्ती नाशिक शहर असो वा जिल्ह्यात त्याचा पक्षाला काय लाभ होतो, हे आगामी काळातच स्पष्ट होईल. त्याबाबत विधान किंवा मत प्रदर्शऩाची घाई करणे योग्य नाही. परंतु नाशिकला एव्हढे घवघवीत प्रतिनिधीत्व मिळाल्याने त्याची चर्चा तर होणारच.

या चर्चेचे कारण म्हणजे, नुकतीच जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारीणी निष्क्रीय असल्याने बरखास्त करण्यात आली. त्या पक्षाने एव्हढा झटपट निर्णय तरी घेतला. नाशिक शहरात गेले सहा वर्षे पक्षाला प्रभारी अध्यक्ष आहे. मात्र प्रभारी अद्यक्षाला कायम करता आले नाही. नवा अध्यक्ष नेमता आलेला नाही. या दरम्यान प्रदेश स्तरावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात असे  तीन अध्यक्ष जाऊन नाना पटोले हे चौथे अध्यक्ष विराजमान झाले आहेत. हे होत असताना अगदी महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना काँग्रेसला शहरासाठी अध्यक्ष मिळालेला नाही.   

...
मी स्वतः पंचवीस वर्षांपासून पक्षाचे काम करतो आहे. `एनएसयुआय` संघटनेपासून कार्यरत आहे. आज पक्षाला नव्या दमाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची गरज आहे. नव्या नियुक्त्यांत ज्येष्ठांना न्याय मिळाला. मात्र यातील काहींना आम्ही पाहिलेले देखील नाही. त्यामुळे आम्हीच गोंधळात पडलो आहोत. 
- वसंत ठाकुर, अध्यक्ष, काँग्रेस सेवादल, नाशिक शहर.
... 

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com