अबब ! नांदेडमध्ये मृत व्यक्तीवर चार दिवस उपचार, हाॅस्पिटलविरोधात गुन्हा दाखल

न्यायालयाच्या आदेशावरून गोदावरी हाॅस्पिटल व्यवस्थापनाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime.jpg
Crime.jpg

नांदेड : नांदेडमध्ये चक्क डॉक्टरांकडूनच (Doctor) मढ्यावरचं लोणी खाण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनामुळे चार दिवसांपुर्वी मृत झालेल्या व्यक्तीवर पैश्याच्या हव्यासापोटी उपचार सुरू असल्याचे दाखवून पैसे उकळल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. (Abb! Four days treatment on dead man in Nanded, case filed against hospital)

न्यायालयाच्या आदेशावरून गोदावरी हाॅस्पिटल व्यवस्थापनाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहरातील हिंगोली गेट परिसरात असलेल्या गोदावरी हाॅस्पिटलमध्ये शिक्षक असलेले अंकलेश पवार यांचा चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला. असे असले, तरीही व्यवस्थापनाने उपचार करत असल्याचे दाखवून नातेवाईकांकडून 1 लाख 40 हजार रुपये उकळले. ही बाब जेव्हा नातेवाईकांच्या लक्षात आली, तेव्हा हाॅस्पिटलला जाब विचारला, मात्र, हाॅस्पिटल व्यवस्थापनाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने अंकलेश पवार यांच्या पत्नीनेन्यायालयात धाव घेतली.

अंकलेश पवार यांना कोरोना झाल्याने 16 एप्रिल रोजी गोदावरी हाॅस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान अंकलेश पवार 21 एप्रिल रोजी मृत झाले, तरीही ही बाब नातेवाईकांना न सांगता उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

24 रोजी हाॅस्पिटल चे बिल भरताच काही वेळात पवार यांचा मृत्यू झाल्याचे हाॅस्पिटल व्यवस्थापनाने सांगितले. ही बाब दुखाःत असल्याने कुटुंबाच्या लक्षात आले नाही. जेंव्हा हाॅस्पिटलचे कागदपत्रे पाहत असताना शुभांगी पवार यांना पती अंकलेश पवार यांचा 21 रोजी झाल्याचे नमुद असल्याचे दिसले. त्यामुळे अॅड. शिवराज पाटील यांच्या मार्फत नांदेडच्या न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने उपरोक्त पुराव्याच्या आधारे हाॅस्पिटल व्यवस्थापनावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्यावरून आज गोदावरी हाॅस्पिटल व्यवस्थापना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा...

राज्यात प्रथमच नगरमध्ये हमाल-मापाडी यांचे स्वतंत्र लसीकरण केंद्र

नगर : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना रुग्णांना सर्व सोयी-सुविधा मिळवून देण्याबरोबरच कोरोना रोखण्यासाठी लसीकरण हे महत्वाचे पाऊल ठरत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे.

यासाठी उपलब्ध लसीचे नियोजन करुन फ्रंटलाईन वर्कर यांना प्राधान्य दिले जात आहेत. हमाल-मापाडी हेही एकप्रकारे फ्रंटलाईन वर्कर आहेत. बाजार समिती, रेल्वे मालधक्का व इतर अनेक अत्यावश्यक सेवांमधील मालांची उचलसाचल करण्याचे काम हे हमाल-मापाडी करत आहेत. या घटकांचेही लसीकरण होणेही आवश्यक असल्याने प्राधान्यक्रमाने त्यांचे लसीकरण करण्यात येत आहेत.

राज्यात प्रथमच हमाल-मापाडी यांचे विशेष केंद्रातून लसीकरण होत आहे.  हमाल-मापाडी यांचे लसीकरण व्हावे, यासाठी हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी माझ्याकडे, शासनाकडे, मनपाकडे अशा विविध स्तरावर पाठपुरावा केला होता; आज त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन लसीकरण होत आहे. हमालांनीही लसीकरण करुन घेऊन आपली व  कुटूंबियांची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
 

हेही वाचा...

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com