धक्कादायक : पत्नी, दोन मुलांना संपवून डॉक्टरने केली आत्महत्या

कर्जत तालुक्यातील राशीन येथे आज सकाळी धक्कादायक घटना घडली आहे. एका डॉक्टरने पत्नी व मुलांसह आत्महत्या केली. या घटनेने नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Shocking: Doctor commits suicide after killing his wife and two children .jpg
Shocking: Doctor commits suicide after killing his wife and two children .jpg

राशीन : कर्जत तालुक्यातील राशीन येथे आज सकाळी धक्कादायक घटना घडली आहे. एका डॉक्टरने पत्नी व मुलांसह आत्महत्या केली. या घटनेने नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

महेंद्र थोरात असे या डॉक्टरचे नाव आहे. पत्नी वर्षा, थोरात मुलगा कृष्णा आणि धाकटा कैवल्य अशी त्यांची नावे आहेत. ते गरिबांचे डॉक्टर म्हणून परिचित होते. सकाळी पेशंट त्यांच्या घरी गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. सामाजिक कामात अग्रेसर असलेला माणून नेमके असे कसे करु शकतो, याची चर्चा परिसरात सुरु झाली आहे. पत्नी व दोन मुलांना इंजेक्शन देऊन नंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली असावी, अशी चर्चा सुरु आहे. पोलिस या घटनेबाबत सखोल तपास करत आहेत. 

डॉक्टरांच्या दवाखान्यात एखादा पेशंट आला आणि त्याच्याकडे पैसे नसले तरी ते स्वतः औषधी घेण्यासाठी पैसे द्यायचे. त्यांची रुग्णांबाबत नियमीत तळमळ असायची. त्यामुळे इतका सह्दयी माणूस असे कसे करु शकतो, याचीच चर्चा कर्जत परिसरात सुरु आहे. 

डॉक्टरांनी टोकाचे पाऊल का उचलले? 

थोरात हे कोमल ह्दयाचे ग्रहस्थ होते. त्यांच्या थोरल्या मुलाला एेकायला कमी येत होते. त्याला समाजाकडून नियमीत अपमानास्पद वागणूक मिळायची, त्यामुळे ते दाम्पत्य व्यथित होते. तो मुलागा अकरावीला होता. पत्नीच्या मदतीने जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सुसाईडनोटमध्ये आढळून आल्याचे पोलिसांनी सांगतिले. 

हे ही वाचा...

पूजा चव्हाणचा घातपातच...
 
पुणे : टीक टाॅक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर विरोधी पक्षाकडून सातत्याने विविध आरोप करण्यात येत आहेत. तेव्हापासून ते नॉट रिचेबल आहेत. ते पोहरादेवी येथे येणार, अशी माहिती महंत सुनील महाराज यांनी दोन दिवसांपूर्वी माध्यमांना दिली होती. पण मंत्री राठोड आलेच नाहीत. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात अद्याप कोणताच खुलासा पोलिस प्रशासनाने केला नाही. यामुळे पूजा चव्हानच्या नातेवाईक शांताताई राठोड यांनी पोलीस तपासावर संशय व्यक्त केलाय. 

पूचा चव्हाणच्या नातेवाईक शांताबाई राठोड म्हणाल्या की, पूजानी आत्महत्या केली नाही. पूजाला ज्या यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तिथेच तिला मारले असावे आणि पुण्यातील बिल्डींगवरून फेकले असावे. असा संशय राठोड यांनी व्यक्त केलाय. पूजा ही आत्महत्या करणारी मुलगी नव्हती. तिने आत्महत्या केली नाही तर तिचा घातच झालाय. असे देखील शांताताई राठोड म्हणाल्या आहेत. 

दरम्याण,  हिंगोली जिल्हा परिषदेच्या मैदानावर संजय राठोड यांच्या समर्थनार्थ बंजारा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे, या मोर्चात सहभागी होण्यासाठी शिवसेना नेते, आमदार संतोष बांगर हे देखील पुढे आले आहेत, मंत्री राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर शिवसेना पहिल्यांदाच या मोर्चाच्या निमित्ताने रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहे. 

"पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी कुणालाही पाठिशी घालणार नाही. या प्रकरणाची चैाकशी पोलिस करीत आहेत. त्यांना चैाकशी वेळ दिला पाहिजे. या तपासात राजकीय हस्तक्षेप नाही, " असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सांगितले होते.

दरम्याण, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पुणे पोलिसांच्या पथकाने दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी यवतमाळ आणि परळीत गेलेल्या पोलिसांच्या पथकाने या दोन जणांना ताब्यात घेतले आहे. संजय राठोड यांना वाचविण्यासाठी पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जात नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com