सरळ-साधेपणाने वागणे, हीच मुंडे यांना श्रद्धांजली : जे. पी. नड्डा - Acting in a straightforward manner, this is a tribute to Munde: J. P. Nadda | Politics Marathi News - Sarkarnama

सरळ-साधेपणाने वागणे, हीच मुंडे यांना श्रद्धांजली : जे. पी. नड्डा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 4 जून 2021

मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्यावरील खास टपाल कव्हरचे प्रकाशन नड्डा व दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते झाले.

नवी दिल्ली : संघर्ष हाच ज्यांचा स्थायीभाव होता, असे माजी केंद्रीय मंत्री व लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्याप्रमाणेच भाजप नेते- कार्यकर्त्यांनी समाजातील शोषित समाजाबरोबर स्वतःला जोडून घेणे व साऱ्या कार्यकर्त्यांशी सरळ-साधेपणाने वागणे हिच मुंडे यांना आदरांजली ठरेल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काल सांगितले. (Acting in a straightforward manner, this is a tribute to Munde: J. P. Nadda)

मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्यावरील खास टपाल कव्हरचे प्रकाशन नड्डा व दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते झाले. या व्हर्च्युअल कार्यक्रमात महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रज्ञा मुंडे, मुंडे यांच्या कन्या पंकजा व खासदार डॉ. प्रीतम मुंडे आदी सहभागी झाले होते. 

नड्डा व प्रसाद यानी मुंडे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. महाराष्ट्राच्या गावागावातील भाजप कायकर्त्यांशी मुंडे यांचा प्रत्यक्ष संवाद होता व राज्याची भौगोलिकदृष्ट्या खडानखडा माहिती मुंडे यांना होती, असे सांगून नड्डा म्हणाले, की ग्रामीण भागाशी, शेतकऱ्यांशी, समाजातील तळागाळातील लोकांशी त्यांची घट्ट बांधिलकी होती, किंबहुना ते या वर्गांचा आवाज बनले होते. त्यामुळेच ग्रामविकास मंत्रालयाला ते नवा चेहरा देतील, अशा हेतूने त्यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामविकास मंत्रालयाची सुत्रे दिली. मात्र त्यांच्या अकस्मिक व अवेळी मृत्यूने नियतीने ही संधी हिरावून घेतली. त्यांची ही तळमळ पक्ष कार्यकर्त्यांनी आपल्या आचारणात आणली पाहिजे.

मुंडे यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या जिजामाता आधार योजना, गरीबांना अल्प दरात भोजन, झोपडपट्टी विकास अशा अनेक योजना आज देशपातळीवर तसेच अनेक राज्य सराकरांनीही अंगातकारल्या आहेत. नंतर फडणवीस सरकारने ऊसतोड कामगारांसाठी स्वतंत्र महामंडल स्थापन करून मुंडे यांना एक प्रकारे आदरांजली वाहिली.  

फडणवीस म्हणाले, की मुंडे यांनी आपल्या कतृत्वाने लोकनेते व जननायक अशी दोन्ही बिरूदे मिळविली. माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना मुंडे यांनी नेते बनविले. सत्तेशी समझओता केला, तर नेता बनत नाही, तर सत्तेशी संघर्ष केला, तरच नेता बनतो, असे ते आम्हाला सांगत असत. संघर्ष हा त्यांचा स्वभाव होता.

खासदार डाॅ. प्रीतम मुंडे या लोकसभेत अभ्यापूर्ण मुद्दे मांडतात व पित्याचा वारसा त्या पुडे नेत आहेत, अशा शब्दांत प्रसाद यांनी खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांचे कौतुक केले. दिवंगत मुंडे यांच्या मोकळ्या स्वभावाची आठवण सांगताना प्रसाद म्हणाले, की 2014 च्या निवडणुकीआधी आम्ही आसामच्या दौऱ्यावर गेलो होतो. तेथे कामाख्या मंदिरात दर्शन घेतल्यावर मी मुंडे यांना विचारले की तुम्ही देवीकडे काय माहितले, तेव्हा ते म्हणाले, की मोदीजींना पंतप्रधान करावे व मला उपपंतप्रधान करावे, हेच मागणे मी देवीकडे मागितले.
 

हेही वाचा...

महापाैर कोणाचा, विखे पाटलांनी घातले लक्ष

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख