महापाैर कोणाचा? खासदार सुजय विखे पाटलांनीही घातलयं लक्ष!

नगर महापालिकेच्या महापाैरपदासाची मुदत 30 तारखेला संपत आहे. सध्या भाजपचा महापाैर आहे. आता कोणत्या पक्षाचा महापाैर होणार, याबाबत जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत.
sujay vikhe.jpg
sujay vikhe.jpg

नगर : नगरच्या महापाैरपदापासून सध्या तरी तटस्थ भूमिका घेण्याचा निर्णय भाजप नगरसेवकांनी घेतला असला, तरी पक्षादेश अंतीम असेल, अशी भूमिका घेत हा निर्णय खासदार डाॅ. सुजय विखे (Dr. Sujay Vikhe Paitl) यांच्यावर सोपावला आहे. त्यामुळे ऐनवेळी खासदार डाॅ. विखे पाटील कोणाला साध देणार, याची उत्सुकता अखेरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. (महापाैर कोणाचा ! डाॅ. विखे पाटलांनीही लक्ष घातलंय, भाजपची भूमिका तटस्थ Whose Mahapair! Dr. Vikhe Patil also paid attention, BJP's role is neutral)

नगर महापालिकेच्या महापाैरपदासाची मुदत 30 तारखेला संपत आहे. सध्या भाजपचा महापाैर आहे. आता कोणत्या पक्षाचा महापाैर होणार, याबाबत जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत.

शिवेसनेने यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपल्याच पक्षाचा महापाैर होण्यासाठी गळ घातली आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसली, त्यांनी कालच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांची भेट घेतली असल्याने त्यात खलबते झाली असण्याची शक्यता आहे. काॅंग्रेसचे नगरसेवक कमी असले, तरीही त्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून फिल्डिंग लावली आहे.

महापिलिकेत शिवसेनेकडे सर्वाधिक 23 नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीकडे 18, भाजपकडे 15, काॅंग्रेस 5, बसप 4, समाजवादी पक्ष 1 व अपक्ष 1 असे बलाबल आहे.

भाजपकडे आरक्षणानुसार उमेदवारच नसल्याने तटस्थ राहण्याची भूमिका सध्या घेतली असली, तरी ऐनवेळी भाजपच्याच भूमिकेला महत्त्व असणार आहे.
भाजपचे काही नगरसेवक राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना माणनारे असल्याचे सांगितले जाते. तसेच आमदार जगताप यांच्या मदतीनेच 
यापूर्वी भाजपला महापाैरपदाची संधी मिळाली होती. त्यामुळे साहजिकच राष्ट्रवादीच्या दिमतीला भाजपला यावे लागेल. त्यामुळे राष्ट्रवादीचे पारडे आपोआप जड होणार आहे.

राष्ट्रवादीचीच भूमिका महत्त्वाची ठरणार

शिवसेनेचा महापाैर होण्यासाठी राष्ट्रवादीने मदत केली, तरच ते शक्य होईल. शिवसेनेमध्ये असलेले दोन गट तसेच शिवसेनेच्याच कार्यकर्त्यामुळे यापूर्वी आमदार जगताप यांना तुरुंगवारी झाली होती, हे ते विसरणार नाहीत. त्यामुळे राज्यात महाआघाडीत हे दोन्ही पक्ष एकत्रित नांदत असले, तरी स्थानिक पातळीवर एकमेकांमधून अद्यापही विस्तव जात नाही, हे सत्य आहे. त्यामुळे समेट घडण्याची शक्यता नाही. मागील वेळी महापाैर निवडणुकीतच याचे पडसाद दिसून आले होते. शिवसेनेकडे संख्याबळ जास्त असतानाही शिवसेनेला या पदापासून दूर राहण्याची वेळ आली होती. त्यावेळी आमदार जगताप यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. या वेळीही तीच वेळ येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com