धर्मनिरपेक्ष आधारावर मार्गक्रमण हे महाविकास आघाडीचे सूत्र ठरवा : काॅंग्रेसची ठाकरेंकडे मागणी

धर्मनिरपेक्ष आधारावर मार्गक्रमण करणे हे महाविकास आघाडीचे ब्रीदवाक्य हवे. तसेच कामगार शेतकरी यांच्यासाठी गतीमान निर्णय व्हावेत, अशी मागणी आमदारांनी केली आहे.
Nana-uddhav-Balasaheb
Nana-uddhav-Balasaheb

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने तयार केलेला किमान समान कार्यक्रम राबवा अन सामान्य नागरिकाला न्याय द्या, अशी मागणी आज विधीमंडळ कॉंंग्रेस पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन केली. सरकार स्थापन करताना सरकार तसेच तीन पक्षांमध्ये संवाद निर्माण करणाऱ्या दोन समन्वय समित्यांचे काम सुरू व्हावे, अशी मागणी आज शिष्टमंडळाने केली. (Congress leaders delegation meet CM Uddhav Thackeray demanding ipmlementation  of common minimum programe) 

धर्मनिरपेक्ष आधारावर मार्गक्रमण करणे हे महाविकास आघाडीचे ब्रीदवाक्य हवे. तसेच कामगार शेतकरी यांच्यासाठी गतीमान निर्णय व्हावेत, अशी मागणी आमदारांनी केली आहे. शिष्टमंडळाने पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिफारस केलेल्या न्याय या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्रात करता येण्याबाबत चाचपणी करता येईल काय, असा विषय उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या विरोधात दिलेला निकाल हा आपल्या विरोधात तर जाणार नाही ना या भीतीने कॉंग्रेस आमदार अस्वस्थ झाले आहेत. हा विषय मार्गी लावा तसेच सामाजिक न्यायाची संकल्पना गतीमान करा, असा आग्रह तरुण कॉंग्रेस नेत्यांनी धरला आहे.

पंतप्रधानांची भेट घेणार

पक्षातील नेत्यांची ही भावना लक्षात घेत विधीमंडळ नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरे यांची वेळ मागितली. आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, युवा नेते डॉ. विश्वजित कदम, अस्लम शेख, प्रा. वर्षा गायकवाड, आदिवासी मंत्री पडवी आदींनी मुख्यमंत्र्यांशी अंमलबजावणीबाबत सुमारे तासभर चर्चा केली. किमान समान कार्यक्रमातील शेतकरी कर्जमाफी आणि १० रुपयात भोजन देण्याचे आश्वासन अगोदरच अंमलात आले आहे. शिवभोजन थाळी सध्या तर मोफत दिली जात आहे, याकडे मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिष्टमंडळाचे लक्ष वेधल्याचे समजते. समन्वय समिती लवकरच नेमण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
पश्चिम बंगालच्या निकालांनंतर कॉंग्रेसने जनाधार व्यापक करण्यासाठी देशभर प्रयत्न सुरु करायचे ठरवले आहे. माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पुन्हा एकदा सक्रीय व्हायचे असेल तर कोरोना हाताळण्यात मोदी सरकारला आलेल्या अपयशाचा आधार मिळेल, असे अभ्यासकांना वाटते.

अनुकूल वातावरणासाठी प्रयत्न

कॉंग्रेसला अनुकूल वातावरण तयार व्हावे यासाठी राज्याराज्यांमध्ये त्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहे. ही भेट या मोहिमेचा भाग मानली जाते आहे. येत्या काळात कॉंग्रेस मुद्द्यांवर आग्रही असेल, असे सांगत एका नेत्याने शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसची आमदार संख्या जास्त असली तरी आमचा पाठिंबा महत्वाचा आहे हे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना त्याची जाणीव असल्याचे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com