दिलासादायक : कोरोना रुग्णांच्या क्रमवारीत महाराष्ट्राची पहिल्यांदाच घसरण...

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये पहिल्या दिवसापासून महाराष्ट्र आघाडीवर राहिला आहे.
Karnattaka sees highest jump in corona cases tally yesterday
Karnattaka sees highest jump in corona cases tally yesterday

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये पहिल्या दिवसापासून महाराष्ट्र आघाडीवर राहिला आहे. मागील काही दिवसांत अनेकदा दररोज 60 हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. तसेच मृतांचा आकडाही देशात सर्वाधिक होता. परिणामी, केंद्र सरकारकडूनही सातत्याने महाराष्ट्र सरकारला सुचना द्याव्या लागत होत्या. पण आता ही स्थिती बदलू लागली आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने कमी होत असून सोमवारी महाराष्ट्र पहिल्यांदाच क्रमवारीत खाली आला. (Karnattaka sees highest jump in corona cases tally yesterday) 

देशातील कोरोना रुग्णांची संख्याही सोमवारी कमी झाली आहे. सोमवारी 24 तासांत देशात 3 लाख 29 हजार 942 रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 2 कोटी 29 लाख 92 हजारांवर पोहचला आहे. तर 24 तासांत 3 हजार 876 मृत्यू झाले असून एकूण मृत्यूचा आकडा जवळपास अडीच लाखांवर पोहचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. महाराष्ट्रासह चार ते पाच राज्यांतील कोरोना रुग्णांचे देशातील प्रमाणच जवळपास 50 टक्के आहे. त्यामध्ये रविवारपर्यंत महाराष्ट्र आघाडीवर होता. 

सोमवारी नव्याने आढळून आलेल्या रुग्णसंख्येत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर गेला. राज्यात 24 तासांत सुमारे 37 हजार रुग्ण आढळले. महाराष्ट्राच्यापुढे कर्नाटक गेले असून काल 39 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले. त्यानंतर तमिळनाडू सुमारे 29 हजार, केरळ 27 हजार आणि उत्तर प्रदेश 21 हजार ही पाच राज्ये देशातील सर्वात संक्रमित राज्य आहेत.

भारताने कोरोना रुग्णांचा एक कोटींचा टप्पा मागील वर्षी 19 डिसेंबर रोजी ओलांडला होता. तर दोन कोटींचा टप्पा केवळ साडे चार महिन्यांत ओलांडला आहे. दुसऱ्या लाटेमध्ये मार्च व एप्रिल महिना खूपच घातक ठरला. या कालावधीत देशातील मृतांचा आकडाही वेगाने वाढला आहे. भारताने आता अमेरिका व ब्राझील या देशांनाही मागे टाकले आहे. त्यामुळे देशासमोरील चिंता अधिकच वाढत चालली आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रात सोमवारी 61 हजार 607 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे राज्यातील बरे होणाऱ्या रुग्णांची सख्या 44 लाख 69 हजारांच्यापुढे गेली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87 टक्क्यांच्या जवळ पोहचले आहे. काल राज्यात 549 जणांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण 1.49 टक्के असून सोमवारी 549 जणांचा मृत्यू झाला. राज्याचा पॅाझिटिव्हिटी दरही कमी झाला असून सध्या तो 17.34 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 36 लाख 70 हजार रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. तर केवळ 26 हजार 600 रुग्ण रुग्णालय किंवा कोविड केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com