राणे 'साहेब' आमच्यावर छत्रपतींचे संस्कार; मुद्द्यांवरून न हटता उत्तर देऊ!

आदरणीय राणे साहेब तुम्हच्यावर लोक फार खालच्या स्तरावर जाऊन टीका करतात.
 Chhatrapati Sambhaji Raje, Narayan Rane .jpg
Chhatrapati Sambhaji Raje, Narayan Rane .jpg

मुंबई : सर्वोच्च न्यायलयाने मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द केल्यानंतर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटत आहेत. आरक्षणावरुन खासदार छत्रपती संभाजीराजेंनी घेतलेल्या भूमिकेवर भाजप खासदार नारायण राणे यांनी गुरुवारी टीका केली होती. त्यावरुन योगेश केदार यांनी छत्रपतींचा मावळा म्हणून फेसबुक पोस्ट लिहित नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर निशाणा साधला आहे.  (Yogesh Kedar criticizes Narayan Rane)

आपल्या पोस्टमध्ये केदार म्हणाले की ''आदरणीय राणे साहेब तुम्हच्यावर लोक फार खालच्या स्तरावर जाऊन टीका करतात. कुणी कोंबडी चोर म्हणते तर कुणी बेडूक....अश्या नानाविध असंसदीय शब्दांनी आपल्यावर शिंतोडे उडवतात. परंतु आमच्यावर छत्रपतींचे संस्कार आहेत. आम्ही तुम्हाला मुद्द्यांवरून न हटता उत्तरे देऊ.'' 

''छत्रपतींवर टीका करण्याची तुमची लायकीच नाही असे म्हणणार नाही, तुम्ही टीका करू शकता. परंतु, साहेब छत्रपती सोबत लोकच नाहीत हा कुठला शोध लावला. आम्ही तुमच्या मालवणला, आरक्षणाची बैठक घ्यायला, किंवा तुम्हाला कोंडीत पकडायला आलो नव्हतो, तर सिंधुदुर्ग किल्ल्यावर तौते वादळामुळे झालेली पडझड बघायला आलो होतो. मराठा समाजाचे कल्याण तुम्ही सर्वच सत्ताधाऱ्यांनी किती केले? जग जाहीर आहे. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र दौरा, सुरू असतानाच, शेकडो किलोमीटरचा प्रवास करून संभाजीराजे पोचले. का तर त्यांना त्यांच्या पूर्वजांनी ठेवलेला वारसा जपण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सोडा तुम्हा सारख्या मोठ्या लोकांना वेळ कुठे असतो दुसरे काय काम करतात हे पाहण्यासाठी.'' असा खोचक टोला केदार यांनी लगावला आहे. 

''दुसरा मुद्दा खासदारकी बाबत तर तुम्ही बोलूच नये. छत्रपती संभाजी महाराजांनी खासदारकी घेतल्यानंतर किती कामे केलीत हे पाहिले तर तुमच्या अख्या हयातीत जे करू शकला नाही, त्यापेक्षा जास्त कामे केली आहेत. म्हणूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केवळ संभाजी महाराजांचे नाव घेतले. तुमच्यावर सुद्धा वैयक्तिक उपकार केले आहेत संभाजीराजेंनी. मुंबई महामोर्चा वेळी, तुमच्या चिरंजीवांच्या गाडीची काय अवस्था केली होती मराठा समाजाने याची माहिती घ्या. त्यांना सुरक्षित ठिकाणी न्यावे लागले होते. झेंड्याचे दांडे हातात घेतले होते मराठा समाजाने. त्यामुळे लक्षात घ्या जो लाखोंचा जमाव राजेंच्या एका शब्दावर घरी परतला, त्याच ठिकाणी राजेंच्या शब्दां खातर लोकांनी नितेश ना सोडून दिले. मग राजे सोबत प्रजा नाही हे कसे म्हणता तुम्ही?''

''त्या आधी 2013 चा मुंबई मधील मोर्चा झाला त्यावेळी तुम्ही राणे समिती वर असताना, स्टेज खालून चपला दाखवल्या होत्या. तिथेही संभाजीराजेंनी पोरांना शांत केले होते. हे तुम्ही विसरला असला म्हणून काय झाले? आम्ही नाही. पक्ष संघटना याबाबत तुम्ही सांगायची गरज नाही. साहेब स्वतःचा स्वाभिमान घान ठेऊन दुसऱ्याची तळी उचलण्याचे संस्कार छत्रपती चे नाहीत. स्वतः पेक्षा समाज मोठा मानणारे लोकच, समाजाच्या हितासाठी काम करतात. त्यांचा स्वतःसाठी, किंवा राजकीय हेतू साठी कधीही वापर करत नाहीत, बहु काय बोलो? शहाण्यास इशारा पुरेसा असतो.'' अशा शब्दात केदार यांनी राणे यांचा समाचार घेतला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com