मनसेच्या व्हिडिओनंतर नांगरे पाटलांनी उपायुक्तांचे टोचले कान!

देशपांडे यांनी एक व्हिडिओ टि्वट करीत ठाकरे सरकारवर खोचक टीका केली होती.
मनसेच्या व्हिडिओनंतर नांगरे पाटलांनी उपायुक्तांचे टोचले कान!
Sarkarnama Banner - 2021-07-12T103849.113.jpg

मुंबई : कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबईत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. पण त्याची कडक अंमलबजावणी केली जात नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे Sandeep Deshpande यांनी दोन दिवसापूर्वी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.Vishwas Nangre Patil instructed Police about Sandeep Deshpande video

देशपांडे यांनी एक व्हिडिओ टि्वट करीत ठाकरे सरकारवर खोचक टीका केली होती. या व्हिडिओची दखल मुंबई पोलिससह आयुक्त विश्वास नांगरे पाटील Vishwas Nangre Patil यांनी घेतली आहे. मनसे नेते संदिप देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ ट्विटरवर टाकला होता.

त्यात दुकानदार ठराविक रक्कम देऊन दुकानं वेळेची मर्यादा संपल्यानंतरही दुकानं उघडी ठेवत असल्याचं म्हटलं होतं. याची गंभीर दखल घेत, मुंबई पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सर्व परिमंडळीय उपआयुक्तांचे कान टोचले आहेत. कोविड 19 च्या अनुशंगाने लागू असलेल्या निर्बंधाची अंमलबजावणी करताना पोलिसांकडून गैरप्रकार होत असल्यास त्यांच्यावर कठोर प्रकारची शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे नांगरे पाटील यांनी त्यांच्या पञात म्हटले आहे.
 
मुंबईत अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांवर वेळेची मर्यादा आहे. सकाळी सात ते चार पर्यंत दुकानं सुरू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. पण कोरोनाच्या नावाखाली मुंबईत नवीन वसुली मोहीम सुरू झाल्याचे देशपांडे यांनी म्हटलं होत. संध्याकाळी चार नंतरही मुंबईतील दुकानं सर्रास सुरू ठेवली जातात व दुकानदारांकडून वसुली केली जात असल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

“आधी वसुली बार मालकांकडून, आता वसुली व्यापाऱ्यांकडून, मुंबईत कोरोनाच्या नावावर नवीन वसुली मोहीम सुरु सायंकाळी चारनंतर दुकान सुरू ठेवण्यासाठी मोठे दुकान 5000, मध्यम दुकान 2000, छोटे दुकान 1000 वसुली चे नवे रेट कार्ड” असं टि्वट संदीप देशपांडे यांनी केलं आहे.  
 
हसन मुश्रीफांवर आमदार शिवेंद्रसिंहराजें संतापले 
सातारा : मुंबईत अतिरेक्याच्या हल्ल्यात शहिद झालेले तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकासाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पण ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी या स्मारकासाठी ५ कोटीचा निधी देण्याची घोषणा केली आहे. यावरुन आमदार शिवेंद्रसिंह राजे संतापले आहेत.  
Edited by : Mangesh Mahale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in